esakal | दुर्दैवी! महिनाभरात एकाच कुटुंबातील तिघांवर काळाचा घाला; अख्ख्या गावात पसरली शोककळा

बोलून बातमी शोधा

null

दुर्दैवी! महिनाभरात एकाच कुटुंबातील तिघांवर काळाचा घाला; अख्ख्या गावात पसरली शोककळा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सेलू (जि. वर्धा) : एका महिन्यातच एकाच कुटुंबातील तीन तरुण मुलांचे अचानक निधन झाले. तालुक्‍याच्या अंतरगाव (हिवरा) येथे ही घटना घडली. या घटनेने गजानन हळदे यांचे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून या दुःखद घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचा: विदर्भ वासियांनो, तुम्ही निवडून दिलेल्या आमदारानं किती दिला कोरोना निधी; जाणून घ्या

सेलू तालुक्‍यातील अंतरगाव (हिवरा) येथील हळदे कुटुंबातील कर्ता तरुण मुलगा राजेंद्र गजानन हळदे (वय 48) याची एकाएकी प्रकृती बिघडल्याने त्याला (ता. 17) एप्रिलला सावंगीच्या विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे उपचारादरम्यान त्याचा मंगळवारी (ता. 20) मृत्यू झाला. या दुःखद प्रसंगातून सावरत नाही तर दुसरा मुलगा संजय गजानन हळदे (वय 44) याचीही प्रकृती बिघडली. त्यालाही 18 एप्रिलला सावंगीच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.

तेथे उपचार सुरू असताना (ता. 23) शुक्रवारला निधन झाले. कुटुंबातील कर्ते दोन मुलं दगावल्याने हळदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

तत्पूर्वी वानाडोंगरी हिंगणा येथे वास्तव्यास असलेली गजानन हळदे यांची मुलगी सरला शेटे (वय 46) यांचेही अल्पशा आजाराने 26 मार्चला नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये निधन झाले होते. एक महिन्याच्या आतच एकाच कुटुंबातील दोन तरुण मुलं व एक मुलगी दगावल्याने हळदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून अंतरगाव परिसरात या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा: रेमेडेसिव्हिरचा अवाजवी वापर टाळा; पालकमंत्री यशोमती ठाकूरांच्या रुग्णालयांना सूचना

राजेंद्र हळदे यांचे पश्‍चात पत्नी, दोन मुले तर संजय याचे पश्‍चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आणि सरला शेटे यांचे पश्‍चात पती, एक मुलगा व मुलगी असा आप्त परिवार आहे.

संपादन - अथर्व महांकाळ