esakal | भीषण अपघात! मोटारसायकली एकमेकांना धडकून ३ युवकांचा मृत्यू; चेहरेसुद्धा ओळखणे झाले कठीण
sakal

बोलून बातमी शोधा

3 youths killed in motorcycle collision Gadchiroli crime news

या अपघाताची तीव्रता एवढी भीषण होती की तीन मृतांचे चेहरेसुद्धा नीट दिसत नव्हते. हा अपघात प्राणहिता नदीवरील पुलापासून एक किमी अंतरावर तेलंगणा राज्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६३ वर घडला.

भीषण अपघात! मोटारसायकली एकमेकांना धडकून ३ युवकांचा मृत्यू; चेहरेसुद्धा ओळखणे झाले कठीण

sakal_logo
By
मिलिंद उमरे

सिरोंचा (जि. गडचिरोली) : सिरोंचा येथून तेलंगणासाठी जात असताना विरुद्ध दिशेने येणारी मोटरसाइकल अनियंत्रित होऊन पुढे जात असलेल्या मोटरसाइकलला जोरात धडकली.

या अपघातात सिरोंचा येथील प्रसाद परसा (वय २६), रेवंत मुदुमडेगेला (वय २१) आणि सुमन सल्ला (वय २२) सर्व रा. रंगाधामपेठा या युवकांचा मृत्यू झाला आहे. तर नितीन जक्का (वय २४) हा तहसील कार्यालयाचा कर्मचारी व रवी सल्ला (वय २५) रा. पोचमपल्ली हे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत.

या अपघाताची तीव्रता एवढी भीषण होती की तीन मृतांचे चेहरेसुद्धा नीट दिसत नव्हते. हा अपघात प्राणहिता नदीवरील पुलापासून एक किमी अंतरावर तेलंगणा राज्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६३ वर घडला.

अधिक वाचा - महापालिकेवर तुकाराम मुंढेचे वर्चस्व कायम! सत्ताधाऱ्यांमध्ये अद्यापही संताप, नव्या आयुक्तांकडून निर्णयाची अंमलबजावणी

अपघातातील मोटरसाइकली किती वेगात होत्या व त्या कशा आपटल्या हे स्पष्ट झाले नाही. जखमींना मंचेरियाल येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. तेलंगणा पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असल्याचे समजते.

loading image