esakal | धास्ती 'बर्ड फ्लू'ची! ३३ हजार ५०० कोंबड्या नष्ट, पोल्ट्री धारकांना मिळणार भरपाई

बोलून बातमी शोधा

33 thousand 500 hens destroyed due to bird flu in amravati

संक्रमित क्षेत्रातील सर्व देशी कुक्कुट पक्षी, पोल्ट्री फार्ममधील पक्षी, इतर प्रजातीचे पाळीव पक्षी पशुसंवर्धन विभागाच्या स्थापित शीघ्रकृती दलांकडून शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्यात आल्या, अशी माहिती डॉ. गोहोत्रे यांनी दिली.

धास्ती 'बर्ड फ्लू'ची! ३३ हजार ५०० कोंबड्या नष्ट, पोल्ट्री धारकांना मिळणार भरपाई
sakal_logo
By
राजू तंतरपाळे

अमरावती : भानखेडा परिसरातील एका पोल्ट्री फार्मवरील कोंबड्यांमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव आढळल्याने परिसरातील विविध फार्मवरील सुमारे 33 हजार 500 कोंबड्या शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्याची प्रक्रिया रविवारी पूर्ण करण्यात आली.  नुकसानग्रस्त पोल्ट्री धारकांना भरपाईपोटी प्रती पक्षी 90 रुपये सानुग्रह मदत देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली.

अमरावती तालुक्‍यातील भानखेडा परिसरातील एका पोल्ट्री फार्मवरील कुक्कुटवर्गीय पक्ष्यांमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाल्याचा अहवाल भोपाळच्या राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेने दिला. त्यामुळे उपविभागीय अधिकारी उदयसिंह राजपूत यांच्याकडून तपासणी होऊन या परिसरातील एक किमी त्रिज्येच्या परिघातील क्षेत्र संक्रमित क्षेत्र व 10 किमी त्रिज्येच्या परिघातील क्षेत्र सर्वेक्षण क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले. संसर्गजन्य आजार प्रतिबंध कायद्यान्वये भानखेड परिसरातील 33 हजार 500 कोंबड्या आज खोल खड्डा करून नष्ट करण्यात आल्या.

हेही वाचा - कोरोना काळातही बेजबाबदारीचा कळस, आरोग्य केंद्रात डॉक्टर अन् कर्मचाऱ्यांचीच दांडी

उपविभागीय अधिकारी राजपूत, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. मोहन गोहोत्रे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विजय रहाटे, सहायक आयुक्त डॉ. कावरे, डॉ. अवघड, डॉ. पेठे यांच्या देखरेखीत कुक्कुट पक्ष्यांना दयामरण देण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात आली. या कामासाठी सुमारे दीडशे पशुसंवर्धन अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली 32 पथके तैनात करण्यात आली होती.

संक्रमित क्षेत्रातील सर्व देशी कुक्कुट पक्षी, पोल्ट्री फार्ममधील पक्षी, इतर प्रजातीचे पाळीव पक्षी पशुसंवर्धन विभागाच्या स्थापित शीघ्रकृती दलांकडून शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्यात आल्या, अशी माहिती डॉ. गोहोत्रे यांनी दिली. पोल्ट्री फार्ममधील एका ठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने भला मोठा खड्डा तयार करण्यात आला. त्यात चुना व इतर डिग्रेडेशन सामग्री टाकून पक्ष्यांना नष्ट करण्यात येऊन सदर खड्डा बुजविण्यात आला. एक किलोमीटरच्या परिघातील परिसर व सदर पोल्ट्री फार्म हा 90 दिवसांसाठी सीलबंद राहील. 

हेही वाचा - भयंकर! मुलींची निर्वस्त्र पूजा करणारी टोळी जेरबंद; भोंदूबाबाला अटक

बर्ड फ्लूचा संसर्ग इतर पक्ष्यांना तसेच इतरत्र फैलावू नये, यासाठी ही कार्यवाही आवश्‍यक होती. पोल्ट्रीधारकांना आवश्‍यक मदत मिळवून देण्यासाठी प्रस्तावाचा पाठपुरावा करण्यात येणार आहे.
-शैलेश नवाल, जिल्हाधिकारी