पक्षीसप्ताह: यवतमाळ जिल्ह्यात तब्बल 343 पक्ष्यांची नोंद; पक्षी निरीक्षण चळवळ होण्याची अपेक्षा 

343 birds are counted in yavatmal district
343 birds are counted in yavatmal district

यवतमाळ : जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धनाच्यादृष्टीने पक्षी अत्यंत महत्वाचे आहेत. अनेक पक्षी प्रजाती दूर्मीळश्रेणीत समाविष्ट होत आहेत. पक्षांचे महत्व लक्षात घेता पहिल्यांदाच राज्यात पक्षीसप्ताह साजरा केला जात आहे. पक्षीनिरीक्षण, अभ्यास ही एक चळवळ व्हावी, अशी अपेक्षा पक्षी मित्रांनी व्यक्त केली.

निळोणा प्रकल्प बॅक वॉटरस्थळी शनिवारी पक्षीनिरीक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपवनसंरक्षक केशव वाभळे, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, उपविभागीय अधिकारी अनिरुद्ध बक्षी, डॉ. आलोक गुप्ता, पक्षीमित्र डॉ. दीपक दाभेरे, जयंत अत्रे, डॉ. प्रवीण जोशी, श्‍याम जोशी, स्वप्नीलकुमार वऱ्हाडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. पक्षीनिरीक्षणादरम्यान स्थलांतरित होऊन आलेल्या पक्ष्यांना अभ्यासकांनी कॅमेराबद्ध केले.

मारुती चितमपल्ली यांच्या जन्मदिनपासून ते पक्षीमित्र डॉ. सलीम अली यांची जयंती 12 नोव्हेंबर या कालावधीत पक्षीगणना केली जाणार आहे. यवतमाळातही येणारे पक्षी, त्यांची नावे, ठिकाण, कालावधी यांची सर्व माहिती सप्ताहात संकलित केली जात आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 343 पक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे. 

ग्रेटर फ्लेमिंगो हा पक्ष्याची नोंद निळोणा धरणावर घेण्यात आली होती. दहा दिवसांत 31 हजार किलो मीटरचा नॉन स्टॉप प्रवास करीत ब्लॅक टेल गोल्ड हा पक्षी येतो, अशी माहिती डॉ. प्रवीण जोशी यांनी दिली. बोरगाव व निळोणा दोन्ही प्रकल्प पक्षीनिरीक्षणाचे हॉट स्पॉट, असल्याचे जयंत अत्रे यांनी सांगितले. पक्षीनिरीक्षण करणाऱ्यांची संख्या कमी असल्याची खंत व्यक्त करण्यात आली. यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी शंकर मडावी, वनक्षेत्र सहायक मंगेश चौधरी, रमाकांत गोहोकर यांच्यासह वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला.

पक्षी हा सृष्टीतील महत्वाचा घटक आहे. झपाट्याने कमी होत असलेल्या पक्षांची संख्या पाहता अनेक पक्षी दूर्मीळ झाले आहेत. या दूर्मीळ पक्षासोबत इतर राज्य व देशविदेशांतून येणाऱ्या पक्षांची माहिती नागरिकांना व्हावी, त्यांना पक्षांचे महत्व कळावे, यासाठी वनविभागाने पुढाकार घेतला आहे.
- केशव वाबळे, 
उपवनसंरक्षक, यवतमाळ.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com