धक्‍कादायक... वर्षभरात संसर्गजन्य आजाराचे 38 मृत्यू 

 38 deaths from infectious diseases during the year
38 deaths from infectious diseases during the year

नागपूर : बदलत्या वातावरणासोबत यावर्षी स्वाइन फ्लू, डेंगी आणि हिवतापाने हातात हात घालून हैदोस पसरवला आहे. डेंगी, स्वाइन फ्लू, जपानी मेंदूज्वरासह मलेरियाने या वर्षात सार्वजनिक आरोग्याच्या नागपूर विभागात 38 जणांचा जीव घेतला. यावरून दरवर्षीप्रमाणे यंदाही नागपूर विभाग संसर्गजन्य आजारांनी होणारे मृत्यू रोखण्यात अपयशी ठरला आहे. 

दरवर्षी डासांच्या डंखापासून तर संसर्ग आजाराचा धोका हा नेहमीचाच. अनेक संसर्गजन्य आजारांवरही औषधांचा काहीच परिणाम होत नाही. परिणामी, रुग्णांना दीर्घकालीन आजार होतो किंवा मृत्यूही संभावण्याची भीती असते. सार्वजनिक आरोग्य विभागाने घेतलेल्या अधिकृत नोंदीनुसार एक जानेवारी ते 30 डिसेंबर 2019 या वर्षभराच्या कालावधीत डेंगी, स्वाइन फ्लू, जपानी मेंदूज्वर तसेच मलेरिया आजाराने 38 जणांचा बळी गेला आहे. 

वर्षभरात नागपूर विभागातील नागपूरसह भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, गोंदिया जिल्ह्यात डेंगीच्या सुमारे 1265 रुग्णांची नोंद झाली. यात 10 जणांचा मृत्यू झाला. डेंगीचा सर्वाधिक प्रकोप नागपूर शहरात होतो. एकट्या नागपूर शहरात डेंगीच्या 636 रुग्णांची नोंद झाली असून यात एका युवकाचा मृत्यू झाला. याखेरीज नागपूर विभागात 2 हजार 124 व्यक्तींना मलेरियाने ग्रासले होते. त्यापैकी 5 जण उपचारादरम्यान दगावले. दोन वर्षांपासून नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये जपानी मेंदूज्वर नव्हता. परंतु यावर्षी 35 जणांना जपानी मेंदूज्वराची लागण झाली. 

त्यापैकी 10 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू पावल्याची नोंद पुणे येथील सार्वजनिक आरोग्य विभागात नोंदवली गेली असल्याची माहिती पुढे आली. 2009 पासून स्वाइन फ्लूची टांगती तलवार वैदर्भीयांवर आहे. दरवर्षी स्वाइन फ्लूचे संकट येते. यावर्षी सहा जिल्ह्यांमध्ये 52 जणांना स्वाइन फ्लूने विळख्यात घेतले असून यातील 13 जण दगावले आहेत. 

दरवर्षीचे आव्हान 
संसर्गजन्य आजार हे आरोग्य व्यवस्थेसमोर दरवर्षीचे आव्हान आहे. मात्र अलीकडे सार्वजनिक आरोग्य विभागात संसर्ग आजारावर तत्काळ प्रभावी प्रतिबंधात्मक व नियंत्रणात्मक उपाययोजना करण्यात येते. यामुळे पूर्वीच्या तुलनेत आता मलेरिया 70 टक्के आटोक्‍यात आणला आहे. स्वाइन फ्लूसह जपानी मेंदूज्वर या संसर्ग आजारांवर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवले आहे. 
- डॉ. मिलिंद गणवीर, सहाय्यक संचालक, (हिवताप)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com