esakal | पांढुर्ण्याच्या गोटमारीत यंदा 455 जखमी
sakal

बोलून बातमी शोधा

पांढुर्णा ः गोटमार यात्रेत एकमेकांवर दगड चालविताना दोन्ही पक्ष.

पांढुर्ण्याच्या गोटमारीत यंदा 455 जखमी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जलालखेडा, (जि.नागपूर) :  मध्य प्रदेशच्या छिंदवाडा जिल्ह्यातील पांढुर्णा व महाराष्ट्रातील सावरगाव या दोन गावांत पोळ्याच्या दिवशी जीवघेणा गोटमार खेळ खेळला जातो. शनिवारी दोन गावांमध्ये झालेल्या गोटमारीत पांढुर्णा या गावातील 215 तर सावरगाव येथील 240 गावकरी जखमी झाले. गंभीर जखमी झालेल्या 4 गावकऱ्यांना नागपूर येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
यावर्षी पोलिसांच्या मोठ्या फौजफाट्यात या दोन्ही गावातील गोटमार पार पडली.मध्य प्रदेशातील पांढुर्णा येथे पोळ्याच्या दुस-या दिवशी ऐतिहासिक गोटमार खेळली जाते. पोळ्याच्या दिवशी जंगलातून पळसाचे झाड आणले जाते. यासोबतच एक झेंडा लावला जातो. पहाटे तीन वाजताच्या सुमारास हा झेंडा पांढुर्णा व सावरगावच्या दरम्यान असलेल्या जाम नदीमध्ये रोवला जातो. दुसऱ्या दिवशी दोन्ही गावांतील नागरिक एकमेकांवर गोटमार करीत झेंडा उचलून नेतात. त्यानंतर तो झेंडा चंडीमातेच्या मंदिरात नेला जातो. यावर्षी पांढुर्ण्याच्या युवकांनी झेंड्यावर ताबा मिळवला. पूजेनंतर गोटमारीचा समारोप करण्यात आला. दरम्यान, या गोटमारीत दोन्ही गावांतील 455 नागरिक जखमी झाले.
बंदी घालण्याचे प्रयत्न असफल
2009 मध्ये मानवाधिकार आयोगाच्या हस्तक्षेपानंतर जिल्हा प्रशासनाने पांढुर्णा व सावरगाव यांच्या दरम्यान होणाऱ्या गोटमार यात्रेत दगड मारण्याच्या या खेळाला थांबविण्यासाठी नाना प्रकारचे प्रयत्न केले, पण आजपावेतो यात्रेचे स्वरूप मात्र बदलले नाही. परिसरात जिल्हा प्रशासनाने गुरुवार (ता.29) दुपारपासूनच कलम 144 लागू केले होते.

loading image
go to top