सिमेंट रस्त्यांवरील दुभाजकांवर 50 हजार झाडे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 जून 2019

नागपूर : शहरातील सिमेंट रस्ते, डांबरी रस्त्यांच्या मध्यभागी दुभाजक तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी 50 हजार झाडे लावण्याचा आराखडा तयार करण्यात येत आहे. शासनाच्या वृक्षलागवड अभियानाअंतर्गत यंदा शहरात 82 हजार 500 वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. मनपा, शासकीय कार्यालये, शिक्षण संस्था, स्वयंसेवी संस्था आणि लोकांनी पुढाकार घेऊन हे अभियान यशस्वी करण्याचे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी केले.

1 जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात वृक्षलागवड अभियान राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत नागपूर शहरातील अभियानाच्या तयारीचा आढावा महापौर नंदा जिचकार यांनी आज घेतला. मनपा मुख्यालयात झालेल्या या बैठकीत आयुक्त अभिजित बांगर, प्रतोद दिव्या धुरडे, जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके, स्थापत्य समितीचे सभापती संजय बंगाले, गलिच्छ वस्ती निर्मूलन व घरबांधणी समितीचे सभापती अभय गोटेकर, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती प्रगती पाटील, दुर्बल घटक समितीचे सभापती हरीश दिकोंडवार, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, जैवविविधता व्यवस्थापन समितीच्या सदस्या सोनाली कडू, आशा उईके, नगरसेवक निशांत गांधी, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता अमीन अख्तर, अविनाश बाराहाते, गिरीश वासनिक, अनिरुद्ध चौगंजकर, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जोशी, ग्रीन व्हिजीलचे कौस्तभ चॅटर्जी, सुरभी जैस्वाल, विद्यापीठाच्या बॉटनी विभागाचे प्रमुख प्रा. श्रीनिवास, निसर्ग विज्ञान मंडळाचे डॉ. विजय घुगे, वनस्पती शास्त्रज्ञ दिलीप चिंचमलातपुरे, एसबीएम महाविद्यालयाचे अजिंक्‍य धोटे यांच्यासह विविध झोनचे सभापती व सहायक आयुक्त, विविध संस्थांचे प्रतिनिधी आणि पर्यावरणप्रेमी उपस्थित होते.
वृक्षलागवड काळाची गरज आहे. वाढत्या प्रदूषणावर आळा घालण्यासाठी आज प्रत्येकाने वृक्ष लावणे गरजेचे आहे. विकास होत असताना वृक्षांची कत्तल होऊ नये. ग्रीन सिटी म्हणून नागपूरला देशात क्रमांक एकवर आणण्यासाठी 1 जुलैच्या वृक्षलागवड मोहिमेत सर्वांनी सहभागी व्हावे.
-नंदा जिचकार, महापौर.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 50 thousand plants on the cement road divisions