वर्षभरात ५०१ शासकीय शाळांना कुलूप; खासगी शाळांना मिळतेय मंजुरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

501 government schools locked in year Sanction for private schools wardha
वर्षभरात ५०१ शासकीय शाळांना कुलूप; खासगी शाळांना मिळतेय मंजुरी

वर्षभरात ५०१ शासकीय शाळांना कुलूप; खासगी शाळांना मिळतेय मंजुरी

नंदोरी : देशात सर्वत्र खासगीकरणाचे वारे वाहत आहेत. यातून शिक्षण क्षेत्रही सुटले नाही. यामुळेच की काय खासगी शाळांना कुलूप लागत आहे तर खासगी शाळांना परवानगी मिळत आहे. शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने ‘युडीआयएसई २०२०-२१’ अहवाल नुकताच प्रसिद्ध केला आहे. यात एका वर्षात ५०१ शासकीय शाळा बंद पडल्या. याच काळात ३ हजार ३०४ नवीन खासगी शाळा सुरू झाल्या आहेत.

शालेय शिक्षण विभागाच्या ‘युडीआयएसई’ अहवालानुसार २०२०-२१ मध्ये १० लाख ३२ हजार ४९ सरकारी व ३ लाख ४० हजार ७५३ खासगी शाळा होत्या. तर २०१९-२० मध्ये १० लाख ३२ हजार ५७० सरकारी आणि ३ लाख ३७ हजार ४४९ खासगी शाळा होत्या. २०२०-२१ मध्ये देशातील कोरोना लाटेचा सर्वात वाईट परिणाम लहान मुलांच्या शिक्षणावर झाला. पूर्व प्राथमिक वर्गामध्ये २९ लाख कमी प्रवेश झाले.

२०१९-२० मध्ये जिथे १ कोटी ३५ लाख ५५ हजार ८९२ मुलांनी प्रवेश घेतला होता. तिथे २०२०-२१ मध्ये १ कोटी ६ लाख ४५ हजार ५२६ पर्यत कमी झाली. त्यापैकी २२ लाख २८ हजार कमी प्रवेश हे खासगी पूर्व माध्यमिक मध्ये झाले. सरकारी शाळांमध्ये ३ लाख १० हजार प्रवेश घटले. तथापि, पहिली ते बारावीपर्यंत २०१९-२० मध्ये कमी झालेली प्रवेश‌ संख्या ७७ हजार ५८८ इतकीच आहे.

महिला शिक्षकांची झपाट्याने वाढ

देशात दोन वर्षांत महिला शिक्षकांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. २०२०-२१ मध्ये ४९ लाख पाच हजार महिला शिक्षिका तर, पुरुष शिक्षक ४७ हजार पाच लाख झाले. २०१८-१९ मध्ये ४७ लाख दोन हजार पुरुष आणि ४७ लाख एक हजार महिला शिक्षिका होत्या. अहवालानुसार २०१९-२० च्या तुलनेत २०२०-२१ मध्ये २ लाख चार हजार महिला शिक्षिका वाढल्या. ३० हजार पुरुष शिक्षक वाढले. एकूण ९९ लाख ९६ हजार शिक्षक आहेत. २०१९-२० मध्ये ९६ लाख ८७ हजार होते.

Web Title: 501 Government Schools Closed In Year Sanction For Private Schools Wardha

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Wardhavidarbhaschool
go to top