बालकांच्या संगोपनाचा प्रश्‍न; कोरोनाने हिरावले ५१ चिमुकल्यांचे छत्र

बालकांच्या संगोपनाचा प्रश्‍न; कोरोनाने हिरावले ५१ चिमुकल्यांचे छत्र

अमरावती : कोरोना महामारीने (coronavirus) जिल्ह्यात ५१ चिमुकल्यांवरील पालकांचे छत्र हिरावले (51 small child lost their parents) आहे. आता या चिमुकल्यांच्या आयुष्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. कोविडमुळे तीन चिमुकल्यांनी दोन्ही पालक गमाविले आहेत. त्याचप्रमाणे ४८ मुला-मुलींनी आई किंवा वडील यापैकी एकाला गमाविले आहे. त्यामुळे कोरोनाने एका नव्या सामाजिक प्रश्‍नाला जन्म दिला (Corona gave birth to the social question) आहे. (51-small-child-lost-their-parents-in-Amravati-district)

निराधार झालेल्या बालकांची माहिती आरोग्ययंत्रणा तसेच कृती दलाद्वारे जिल्हा प्रशासनाला उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोरोना महामारीमुळे सर्वच घटक प्रभावित झालेले असून, सर्वाधिक प्रभाव चिमुकल्यांवर झाला आहे. अनेक कुटुंबांतील आई किंवा वडील तसेच आई-वडील दोन्हीही कोरोनामुळे मरण पावल्याने बालकांवर मानसिक आघात झाला आहे.

बालकांच्या संगोपनाचा प्रश्‍न; कोरोनाने हिरावले ५१ चिमुकल्यांचे छत्र
दिल्ली बाॅर्डरवर शेतकरी सहा महिन्यांपासून तर मंगरुळपीरात १३ वर्षांपासून ताटकळत

अशा बालकांची माहिती गोळा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिल्यानंतर गावातील ग्राम समिती, अंगणवाडी सेविकांच्या गृहभेटीद्वारे त्या कुटुंबातील सदस्यांशी संपर्क साधण्यात आला. ज्या बालकांनी दोन्ही पालक गमाविले आहेत, त्या बालकांना जवळच्या नातेवाइकांकडे ठेवण्यात आले आहे. ही मंडळी जर त्या बालकांना ठेवण्यास तयार नसतील तर त्यांना शासनाच्या बालसंगोपनगृहात ठेवण्यात येणार आहे. सध्या ही बालके पूर्णपणे सुरक्षित असल्याचे बालकल्याण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

दरमहा मिळणार आर्थिक मदत

कोरोना संसर्गामुळे ज्या बालकांचे आई किंवा वडील तसेच दोन्हीही हिरावले गेल्यास त्यांना शासनाकडून दरमहा १,१०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. वयाची १८ वर्षे पूर्ण होईपर्यंत या बालकांना ही मदत मिळत राहणार आहे.

बालकांच्या संगोपनाचा प्रश्‍न; कोरोनाने हिरावले ५१ चिमुकल्यांचे छत्र
‘कमल का फूल ही सबसे बडी भूल है!’ यशोमती ठाकूर यांची मोदी सरकारवर टीका
कोरोना संसर्गामुळे ५१ बालकांच्या पालकांचा मृत्यू झाला असून, टास्क फोर्सच्या मदतीने अशा बालकांचा शोध घेण्यात आला आहे. सर्व बालके सुरक्षित आहेत. त्या बालकांच्या संगोपनाची काळजी घेतली जाणार आहे.
- शैलेश नवाल, जिल्हाधिकारी, अमरावती

(51-small-child-lost-their-parents-in-Amravati-district)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com