esakal | अमरावतीत कोरोनाचा ग्राफ वाढताच; आज 522 नवे रुग्ण

बोलून बातमी शोधा

corona
अमरावतीत कोरोनाचा ग्राफ वाढताच; आज 522 नवे रुग्ण
sakal_logo
By
सुधीर भारती

अमरावती : जिल्ह्यात कोरोनाचा ग्राफ परत एकदा चांगलाच वाढला असून मंगळवारी (ता.13) तब्बल 522 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, तर आठ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 53 हजार 314 च्या घरात पोहोचली. आतापर्यंत मृतांची संख्या 726 झाली आहे.

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, डॉ. पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड ऍन्टीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळांच्या अहवालानुसार जिल्ह्यात 522 नवे कोरोना रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे. एप्रिलच्या सुरुवातीला रुग्णसंख्या काहीशी नियंत्रित स्वरूपाची होती, मात्र, नंतर सहा एप्रिलपासून सातत्याने रुग्णसंख्या 300 च्यावर आहे. मंगळवारी आढळून आलेली रुग्णवाढ एप्रिल महिन्यातील आतापर्यंतची सर्वाधिक वाढ आहे. सध्या 1 हजार 165 रुग्ण भरती असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत तर 2 हजार 214 रुग्ण होमआयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत. रुग्ण दुप्पटीचा कालावधी 132 दिवसांचा असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92.30 इतका आहे.

हेही वाचा - आज 'ते' सेंटर असते तर वाचला असता कोरोना रुग्णांचा जीव

मृत्यूदर स्थिर -

जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णसंख्या वाढत असली तरी मृत्यूदर मात्र स्थिर आहे. जिल्ह्याचा विचार करता सध्या मृत्युदर 1.36 इतका असल्याचे आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.

आज झालेले मृत्यू -

जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिलेल्या माहितीनुसार, येरला येथील 40 वर्षीय पुरुष, वरुड येथील 61 वर्षीय पुरुष, मोर्शी तालुक्‍यातील 55 वर्षीय पुरुष, गाडगेनगर येथील 65 वर्षीय पुरुष, धारणी येथील 85 वर्षीय पुरुष, चांदुर रेल्वे तालुक्‍यातील 60 वर्षीय पुरुष, याच तालुक्‍यातील 6 महिन्याची बालिका तसेच मोर्शी तालुक्‍यातील 60 वर्षीय पुरुषाचा आज मृत्यू झाला.