वर्ध्यात गर्भपाताचं रॅकेट उद्ध्वस्त? खड्ड्यात आढळली ५४ हाडे, ११ कवट्या! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Abortion
आर्वी : बायोगॅसच्या खड्ड्यात ५४ हाडे, ११ कवट्या

वर्धा : गर्भपाताचं रॅकेट उद्ध्वस्त? आढळली ५४ हाडे, ११ कवट्या!

आर्वी : येथील अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणात (Abortion of a minor girl)पोलिसांनी कदम हॉस्पिटलची झाडाझडती घेतली. या रुग्णालयाच्या मागे असलेल्या बायोगॅसच्या खड्ड्यात (biogas pit)५४ हाडे आणि ११ कवट्या आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही हाडे (bones)आणि कवट्या (skulls)केव्हाच्या या संदर्भात तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.

हेही वाचा: ओमिक्रॉनचा भारतात एक बळी,जगात किती? आरोग्य मंत्रालयानं केलं स्पष्ट

या प्रकरणात आरोपी असलेल्या महिला डॉ. रेखा कदम यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. तर त्यांना या प्रकरणात सहकार्य करणारी परिचारीका संगिता काळे (वय ३८) हिला अटक करण्यात आली आहे. सापडलेल्या अवय्यवाचा आणि नुकत्याच घडलेल्या या गर्भपात प्रकरणाशी याचा संबंध नसला तरी आढळलेले हे अवय्यव केव्हाचे आणि कशाचे हे तपासाअंतीच पुढे येणार असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. तपासणीकरिता हे अवय्यव ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टरांकडे देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. आर्वी येथील डॉ. रेखा कदम यांनी अल्पवयीन मुलीचा गर्भपात केल्या प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली होती. तर यात मुलीशी संबंध प्रस्तापीत करून तीला गर्भवती करणाऱ्या मुलाच्या आई-वडिलांनाही अटक करण्यात आली होती. आता या प्रकरणात पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. यात सध्या तपासात असलेल्या या प्रकरणात बऱ्याच गोष्टी उघड होण्याची शक्याता निर्माण झाली आहे.

हेही वाचा: कोरोना 20 मिनिटांनंतर होतो 90% ने कमी संसर्गजन्य; संशोधनातून आलं समोर

रुग्णालयातील सोनोग्राफी मशीन सील

पोलिसांकडून शहरातील जुन्या असलेल्या या रुग्णालयाची तपासणी सुरू केली असता अनेक बाबी उघड होत आहेत. यात रुग्णालयाकडून बायोमेडिकलची विल्हेवाटही नियमानुसार (Disposal of biomedical)नसल्याचे पुढे येत आहे. शासनमान्य गर्भपात केंद्रात गर्भपात केल्यानंतर त्याची विल्हेवाट लावण्याच्या पद्धतीला येथे बगल देण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. आता यात येणाऱ्या अहवालाकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत.

कदम हॉस्पिटलमध्ये आज तपासणी केली असता त्यात ५४ हाडे आणि ११ कवट्या मिळून आल्या. यामुळे ते तपासणीकरिता ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आली आहे. त्या अहवालाकडे लक्ष आहे. या प्रकरणात एका आरोपीला आणखी अटक करण्यात आली आहे.

- ज्योत्स्ना गिरी तपासी अधिकारी, पोलिस उपनिरीक्षक आर्वी

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :vidarbhaBone Healthbiogas
loading image
go to top