ठार झालेल्या १३ नक्षलवाद्यांवर होते ६० लाखांचे बक्षीस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

file image

ठार झालेल्या १३ नक्षलवाद्यांवर होते ६० लाखांचे बक्षीस

गडचिरोली : जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्‍यातील पैडी जंगल परिसरात पोलिसांनी शुक्रवार (ता. 21) यमसदनी धाडलेल्या 13 नक्षलवाद्यांची (13 naxal killed) ओळख पटली असून त्यांच्यावर एकूण 60 लाख रुपयांचे बक्षीस सरकारने जाहीर केले होते. (60 lakh rupees reward on 13 killed naxals in gadchiroli)

हेही वाचा: गडचिरोलीत पोलिस आणि नक्षल्यांमध्ये चकमक; १३ नक्षलवाद्यांचा खात्मा

यातील नंदिनी उर्फ प्रेमबत्ती मडावी ही कसनसूर एलओएस दलमची एसीएम असून तिच्यावर 6 लाख रुपयांचे बक्षीस होते, सतीश उफृ अडवे देवू मोहंदा हा कंपनी - 4 चा डीव्हीसीएम असून त्यांच्यावर 16 लाख, किशोर उर्फ शिवा उर्फ शिवाजी बारसू गावडे हा कंपनी - 4 चा पीएम असून त्याच्यावर 4 लाख, रूपेश उर्फ लिंगा मस्तारी गावडे हा कसनूसर एलओएस दलमचा उपकमांडर असून त्याच्यावर 6 लाख, सेवंती हेडो ही कसनसूर एलओएस दलमची पीएम असून तिच्यावर 2 लाख, किशोर होळी हा पैदी एरीया जनमिलिशीचा असून त्याच्यावर 2 लाख, गुनी उर्फ बुकली धानू हिचामी ही कंपनी - 4 ची पीपीसीएम असून तिच्यावर 4 लाख, रजनी ओडी ही कसनसूर एलओएस दलमची पीएम असून तिच्यावर 2 लाख, उमेश परसा हा कसनसूर एलओएस दलमचा एसीएम असून त्याच्यावर 6 लाख, सगुना उर्फ वसंती उर्फ वत्सला लालू नरोट ही चातगाव दलमची पीएम 2 लाख, सोमरी उर्फ सुनीता उर्फ सविता पापय्या नैताम ही कसनसूर एलओएस दलमची सदस्य असून तिच्यावर 6 लाख, तर रोहीत उर्फ मनेश उर्फ मानस उर्फ सोनारू सत्रु कारामी हा कसनसूर एलओएस दलमचा पीएम असून त्याच्यावर 2 लाख रुपयांचे बक्षीस सरकारने जाहीर केले होते.

loading image
go to top