गडचिरोलीत पोलिस आणि नक्षल्यांमध्ये चकमक; १३ नक्षलवाद्यांचा खात्मा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गडचिरोलीत पोलिस आणि नक्षल्यांमध्ये चकमक; १३ नक्षलवाद्यांचा खात्मा

गडचिरोलीत पोलिस आणि नक्षल्यांमध्ये चकमक; १३ नक्षलवाद्यांचा खात्मा

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात (Gadchiroli district) नेहमीच पोलिस (Police) आणि नक्षलवाद्यांमधील (naxalites) संघर्ष निर्माण होत असतो. काही दिवसांपपूर्वी झालेल्या चकमकीमध्ये पोलिस दलाचे अनेक जवान शाहिद झाले होते. आता मिळालेल्या माहितीनुसार , गडचिरोलीमधील धानोरा तालुक्यातील राज्याच्या सीमावर्ती भागात आज सकाळच्या सुमारास पुन्हा पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली आहे. (Clashes between police and Naxals in Gadchiroli)

हेही वाचा: 'चक्रीवादळामुळे फक्त गुजरातचं नुकसान झालं का?'

पोटेगाव पोलिस स्टेशन अंतर्गत भेंडीकनार गावाच्या जंगल परिसरात आज सकाळच्या सुमारास ही चकमक उडाली यात जवळपास १३ नक्षल्यांचा खात्मा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

गडचिरोली पोलिस दलाचे सी ६० जवान गडचिरोली धानोरा तालुक्याचा सीमावर्ती भागातील भेंडीकनार गावाच्या जंगल परिसरात नक्षल विरोधी अभियान राबवित होते. त्यामुळे तिथे दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी C ६० जवानांवर अंधांधुंध गोळीबार सुरु केला. पोलिसांकडून या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देण्यात आलं. जवानांनीही गोळीबार सुरु केला. पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवाद्यांनी तिथून पळ काढला .

हेही वाचा: कोरोना नाही तर 'या' आजाराचं मेळघाटातील गावात थैमान

यानंतर परिसरात शोध मोहीम राबवण्यात आली. यात पोलिसांना तिथे जवळपास १३ नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळुन आले आहेत . सी ६० जवानांकडून अजूनही युद्धस्तरावर शोध मोहीम सुरु आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार मृत नक्षलवाद्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

(Clashes between police and Naxals in Gadchiroli)

loading image
go to top