esakal | नागपूर विभागात म्युकर मायकोसिसचे १०६४ रुग्ण, आतापर्यंत ६३ जणांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

mucormycosis

नागपूर विभागात म्युकर मायकोसिसचे १०६४ रुग्ण, आतापर्यंत ६३ जणांचा मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरोनाविषाणू (coronavirus) आटोक्यात येत असताना आता म्युकोरमायकोसीसचा (mucormycosis) (बुरशीजन्य आजार) उद्रेक वाढला आहे. बुरशीचा आजार अतिशय भयावह आणि धडकी भरवणारा असल्याने नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नागपूर जिल्ह्यात शासकीय आणि विविध खासगी रुग्णालयांमध्ये मंगळवारी (ता.२५) म्युकरमायकोसिसचे २८ रुग्ण आढळून आले असून ३ मृत्यू झाले आहेत. तर पूर्व विदर्भात (east vidarbha) आज ४० रुग्ण आढळून आले आहेत, आतापर्यंत नागपूर विभागात १०६४ रुग्ण आढळून आले असून ६३ जणांचा मृत्यू झाला आहे. (63 mucormycosis patients died till date in nagpur division)

हेही वाचा: corona positive story : एचआरसीटी स्कोअर १८ तर ऑक्सिजन लेव्हल ८२; मग झाला पुनर्जन्म

नागपुरसहित पूर्व विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, गोंदिया या सहा जिल्ह्यांमध्ये बुरशीजन्य आजाराचे आतापर्यंत १ हजार ६४ रुग्ण आढळून आले आहेत, तर ६३ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. यात सर्वाधिक ५८ मृत्यू नागपूर जिल्ह्यातील आहे. कोरोनाउपचारादरम्यान खासगी रुग्णालयात मोठ्या प्रमाणात स्टेरॉईड वापरण्यात आला. यामुळेच बुरशीजन्य आजाराचे नवे संकट उभे ठाकले आहे. मेडिकलमध्ये १०४ म्युकरमायकोसिसचे रुग्ण दाखल आहेत. मेडिकलमध्ये आतापर्यंत १३ जण या आजाराने दगावले आहेत. मेयोतही ३४ जण उपचारासाठी दाखल आहेत.

असे आहेत रुग्ण

जिल्हा बुरशीचे रुग्ण मृत्यू

  • भंडारा ६ ०

  • चंद्रपूर ५९ ०१

  • गडचिरोली ०० ००

  • गोंदिया २५ ०३

  • नागपूर ९१० ५८

  • वर्धा ६४ ०१