
नागपूर : बोगस शालार्थ आयडीच्या माध्यमातून विभागातील ६३३ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नियुक्ती देण्यात आली असल्याची माहिती शिक्षण संचालकांच्या समितीकडून करण्यात आलेल्या चौकशीत समोर आली आहे. या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या चौकशीची शिफारसही समितीने शालेय शिक्षण विभागाला सादर केलेल्या अहवालातून केली आहे.