esakal | ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज तर भरले, पण एका दिवसातच एक वगळता सर्वच अर्ज घेतले मागे
sakal

बोलून बातमी शोधा

65 nomination form take back out of 66 in bhisi grampanchayat election

निवडणूक लढवायची की नाही या संभ्रमात उमेदवार होते. रविवारी पार पडलेल्या एका बैठकीत 66 उमेदवारांनी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला. सोमवारी (ता. 4) 66 पैकी 65 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. 

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज तर भरले, पण एका दिवसातच एक वगळता सर्वच अर्ज घेतले मागे

sakal_logo
By
जितेंद्र सहारे

भिसी (जि. चंद्रपूर ) :  भिसी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची घोषणा 11 डिसेंबरला झाली. त्याच्या काही दिवसांनी नगरपंचायत करण्यात आल्याची पहिली घोषणा शासनाने केली. एकीकडे नगरपंचायतीकडे वाटचाल करणाऱ्या भिसीत ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम झाला. त्यामुळे निवडणूक लढवायची की नाही या संभ्रमात उमेदवार होते. रविवारी पार पडलेल्या एका बैठकीत 66 उमेदवारांनी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला. सोमवारी (ता. 4) 66 पैकी 65 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. 

हेही वाचा - समाजमन सुन्न! गणपती-पुळेला जाण्यासाठी निघाले तरुण, पण वाटतेच काळाचा घाला; एकाच...

मुदत संपुष्टात आलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम आयोगाने डिसेंबर महिन्यात जाहीर केला. चिमूर तालुक्‍यातील भिसी सर्वांत मोठी ग्रामपंचायत आहे. निवडणूक कार्यक्रम झाल्यानंतर प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज भरले. मात्र, त्यानंतर नगरपंचायतीची उद्‌घोषणा शासनाने केली. नगरपंचायतीची उद्‌घोषणा झाल्यानंतर निवडणूक लढवायची की नाही याबाबत उमेदवारांत संभ्रम होता. रविवारी येथील विठ्ठल-रुखमाई मंदिर सर्वपक्षीय बैठक पार पडली. याच बैठकीत ग्रामपंचायतीची निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला. 66 उमेदवारांनी अर्ज मागे घेण्याचा ठराव बैठकीत घेतला. 

हेही वाचा - नागपूर ब्रेकिंग : दयाशंकर तिवारी शहराचे ५४ वे महापौर; काँग्रेसचे रमेश पुणेकर पराभूत

सोमवारी (ता. 4) 66 उमेदवारांनी चिमूर तहसील कार्यालय गाठले. त्यापैकी 65 उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अर्ज परत केले. भिसी नगरपंचायतीची निर्मिती तातडीने करण्यासाठी भिसीवासींनी एकतेचे दर्शन दाखविले. उमेदवारी मागे घेतल्याचे निवेदन तहसीलदारांमार्फत प्रशासनाला पाठविण्यात आले.