उखडलेल्या रस्त्यांसाठी 68 लाख

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 सप्टेंबर 2019

यवतमाळ  : शहरातील उखडलेल्या रस्त्यांमुळे शहरवासी हैराण झाले आहे. अखेर या रस्त्यांच्या कामासाठी पालिकेला महूर्त सापडला आहे. शहरातील सर्व प्रभागांतील रस्ता दुरुस्तीसाठी जवळपास 68 लाख रुपये खर्च केले जाणार असून हा विषय मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेसमोर जाणार आहे.

यवतमाळ  : शहरातील उखडलेल्या रस्त्यांमुळे शहरवासी हैराण झाले आहे. अखेर या रस्त्यांच्या कामासाठी पालिकेला महूर्त सापडला आहे. शहरातील सर्व प्रभागांतील रस्ता दुरुस्तीसाठी जवळपास 68 लाख रुपये खर्च केले जाणार असून हा विषय मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेसमोर जाणार आहे.

शहरात येणाऱ्या मुख्य मार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. शिवाय अंतर्गत रस्ते उखडले आहेत. या रस्त्यांची डागडूजी तसेच पॅच रिपेअरींग करण्याची मागणी नागरिकांची आहे. मात्र, पालिकेचे याकडे दुर्लक्ष होते. पावसाळ्यापूर्वी ही कामे होणे आवश्‍यक होते. मात्र, याला महूर्त मिळाला नसल्याने नागरिकांना खड्डयातूनच रस्ता काढावा लागला. उशीरा का होईना, अखेर शहरातील रस्ते दुरुस्तीला महूर्त मिळाला आहे. पालिकेने शहरातील रस्ते दुरुस्तीचा जवळपास 68 लाख रुपयांचा प्रस्ताव तयार केला आहे. शहरातील चारही झोनमधील रस्त्यांची दुरुस्ती केली जाणार आहे. रस्ते दुरुस्तीचा विषय मंगळवारी (ता.तीन) सर्वसाधारण सभेसमोर मंजुरीसाठी येणार आहेत. रस्त्याचे खडीकरण व पॅच रिेपेअरिंगसाठी झोन एक ते चारमध्ये प्रत्येकी पाच लाख रुपयांच्या कामांचे अंदाजपत्रक आहे. बसस्थानक चौक ते लोहारा चौक यासह शहरातील डांबरीकरण पॅच रिपेअरींगसाठी 49 लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. सर्वसाधारण सभेत या विषयाला मंजूरी मिळाल्यानंतर लवकरच शहरातील रस्ता दुरुस्तीची कामे हाती घेतली जाण्याची शक्‍यता आहे.
शहरातील अनेक भागांतील रस्त्यांची चाळणी झाली आहे. त्यातही उमरसरा, वाघापूर, भोसा, वडगाव या परिसरातील रस्त्यांवर पावसाळ्यात चालणेही कठीण होत आहे. परंतु, पालिकेने याकडे सपशेल दुर्लक्ष केले आहे. आता या भागांतील नागरिकांच्याही अपेक्षा उंचावल्या असून पालिकेकडून मोठ्या अपेक्षा आहेत.

कचऱ्यांचा प्रश्‍न अजेंड्यावर
शहरातील रस्ते उखडले असले तरी कचऱ्याच्या प्रश्‍नांवर नगरसेवक सध्या चांगलेच आक्रमक झाले आहेत. शनिवारी (ता.31) सर्वसाधारण सभा नगरसेवकांनी वॉकआउट केल्याने स्थगित झाली. त्यावेळी आधी कचरा प्रश्‍नानंतर इतर विषयावर चर्चा करू, असे नगरसेवकांनी जाहीर केले आहे. त्यामुळे उद्याच्या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 68 lakh for overcrowded roads