esakal | धक्कादायक! मद्यपींना दारू मिळेना; चक्क घेतात सॅनिटायझरचा घोट; चार दिवसात 7 जणांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

धक्कादायक! मद्यपींना दारू मिळेना; चक्क घेतात सॅनिटायझरचा घोट; चार दिवसात 7 जणांचा मृत्यू

धक्कादायक! मद्यपींना दारू मिळेना; चक्क घेतात सॅनिटायझरचा घोट; चार दिवसात 7 जणांचा मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वणी (जि, यवतमाळ) : अल्कोहोलीक व्यसनाधीन व्यक्ती नशे करीता टोकाचे पाऊल उचलतांना दिसत आहे काही दिवसापुर्वीच सॅनिटायझर प्राशन केल्याने तब्बल 6 व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला होता. तर मंगळवार दि. 27 एप्रीलला सकाळी 8.30 वाजता येथील माळीपुरा येथे वास्तव्यास असलेल्या 49 वर्षीय इसमाचा सॅनिटायझर प्राशन करुन मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

हेही वाचा: अमरावतीकरांनो सावधान! रस्त्यांवर फिरतोय कोरोना व्हायरस; नियमांचं पालन कराच; अन्यथा...

माळीपुरा येथे वास्तव्यास असलेले अनिल चंपत गोलाईत 49 असे मृतकाचे नांव आहे. मोलमजुरी करुन आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह ते करत होते. मात्र त्यांना दारुचे व्यसन जडले असल्याने त्यांना दारु सेवन केल्याशिवाय दैनंदिन कामे करणे अवघड होत होते. घटनेच्या दिवशी सकाळ पासुनच ते दारुच्या शोधात होते

मात्र टाळेबंदी व संचारबंदीमुळे देशी विदेशी दारुची दुकाने बंदावस्थेत आहेत. तर चढया दराने मिळणारी दारु सेवन करण्याची ऐपत नसल्याने त्यांनी चक्क सॅनिटायझरचा घोट गळयात उतरविला.

हेही वाचा: 'दीपाली चव्हाणची आत्महत्या नव्हे तर संस्थात्मक हत्या'; माजी न्यायमूर्ती बी. जे. कोळसे पाटील यांचं मत

काही कालावधीतच त्यांना मळमळ व उलटया व्हायला लागल्या. या बाबत पारिवारीक मंडळीना कळताच त्याला तात्काळ येथील ग्रामीण रुग्णांलयात दाखल करण्यात आले. मात्र उपचाराला प्रतीसाद न देताच त्यांची जीवनयात्रा संपली. वणी शहरात देशी विदेेशी दारुची दुकाने बंद असल्याने व्यसनाधीन व्यक्ती सॅनिटायझर सेवन करतांना दिसत असुन आता पर्यंत 7 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. ही बाब अतिशय गंभीर असुन समाज जागृतीची गरज निर्माण झाली आहे.

संपादन - अथर्व महांकाळ

loading image