esakal | अमरावतीकरांनो सावधान! रस्त्यांवर फिरतोय कोरोना व्हायरस; नियमांचं पालन कराच; अन्यथा...
sakal

बोलून बातमी शोधा

अमरावतीकरांनो सावधान! रस्त्यांवर फिरतोय कोरोना व्हायरस; नियमांचं पालन कराच; अन्यथा...

अमरावतीकरांनो सावधान! रस्त्यांवर फिरतोय कोरोना व्हायरस; नियमांचं पालन कराच; अन्यथा...

sakal_logo
By
संतोष ताकपिरे

अमरावती : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे पंतप्रधानांपासून तर मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांनीच नागरिकांनी काय काळजी घ्यावी याबाबत आवाहन केलेले आहे. परंतु तरीही बेशिस्त वर्तन करणाऱ्यांत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

हेही वाचा: व्हीआयपींच्या एका फोनवर मिळतो लसीचा डोस; सामान्यांना मात्र बाहेरचा रस्ता; नागपुरातील वास्तव

बेशिस्त वर्तन ठेवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यासोबतच जनजागृतीचा एक भाग म्हणून वाहतूक शाखेच्या पोलिसांनी कोरोनाची प्रतिकृती तयार केली. त्याद्वारे हात स्वच्छ धुणे, चेहऱ्याला मास्क लावणे, हात सॅनिटायझरने वारंवार स्वच्छ करणे, सोशल डिस्टंन्सिंगचे नियम पाळणे, याबाबत शहरातील मुख्य चौकात वाहतूक पोलिसांसोबत कोरोनाची प्रतिकृती धारण केलेल्या व्यक्तीकडून याबाबी नागरिकांच्या मनावर बिंबविण्याचा प्रयत्न सुरू केला.

सोमवारी (ता. 26) राजकमल चौक, जयस्तंभ, पंचवटी, शेगाव नाका चौकात वाहतूक पोलिसांसोबत प्रतिकृती धारण केलेल्या व्यक्तीने नागरिकांना त्याचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला. शहरात वाहतूक पोलिसांसह ठाण्याच्या स्तरावरूनसुद्धा 45 नाकाबंदी पॉइंट लावण्यात आले. जिल्ह्याच्या सीमांवरही तशीच देखरेख सुरू आहे. त्यापैकी महत्त्वाच्या तपासणी नाक्‍यांवर कोरोनाच्या प्रतिकृतीसह पोलिस आपले दैनंदिन कर्तव्यसुद्धा पार पाडणार आहे.

हेही वाचा: 'दीपाली चव्हाणची आत्महत्या नव्हे तर संस्थात्मक हत्या'; माजी न्यायमूर्ती बी. जे. कोळसे पाटील यांचं मत

पंधरा दिवसांच्या संचारबंदीनंतर पूर्वीप्रमाणे पोलिस कर्मचारी, अधिकारी हे रस्त्यावरच आहेत. वाहनांची तपासणी तसेच बेशिस्तांवर दंडात्मक कारवाई शहराच्या विविध कानाकोपऱ्यांत मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. वाहतूक शाखेचे सहायक पोलिस आयुक्त किशोर सूर्यवंशी, श्री. अवचार व प्रवीण काळे यावेळी उपस्थित होते.

संपादन - अथर्व महांकाळ

loading image
go to top