
चंद्रपूर : माहिती तंत्रज्ञानाच्या (Information Technology) क्रांतीमुळे जग जवळ आले. जाती-धर्मांच्या भिंती तुटून पडतील, असे वाटायला लागले. तसे चित्रही निर्माण झाले. गावखेड्यातील जातीवरून बहिष्कृत करण्याच्या घटनांनी जातीअंताच्या आभासी चित्राला अधेमधे तडे जातात. आता मात्र शहरात सुरू अशा घटना घडायला लागल्या आहे. चंद्रपूर शहरातील (Chandrapur City) भंगाराम वॉर्डात जातपंचायतीमुळे बहिष्कृत कुटुंबातील सात बहिणींनी आपल्या वडिलांच्या पार्थिवाला खांदा देण्यासाठी समोर यावे लागले. यानिमित्ताने पुरोमागी महाराष्ट्र या शब्दालाही तडे गेले. (7 sisters did last rights on father as community forcefully isolate them in chandrapur)
शहरातील भंगाराम वॉर्ड येथे राहणा-या प्रकाश ओगले यांचे रविवारीला दीर्घ आजाराने निधन झाले. ओगले यांच्या मृत्यूची माहिती त्यांच्या आप्तांना देण्यात आली. ते गोंधळी समाजाचे. या जातीत एकही व्यक्ती, त्यांचे नातेवाईक मृत्यूनंतरसुद्धा आले नाही. 15 वर्षांपूर्वी ओंगले कुटुंबीयांवर टाकलेला बहिष्कार त्यांच्या मृत्यूनंतरसुद्धा कायम होता.
ओगले कुटुंबीय आतापर्यंत आर्थिक विवंचनेत जगत आहे. हाताचा तोंडाची गाठ रोज कशी तरी पडायची. त्यांना सात मुली आणि दोन मुले. गाठीला पैसा नाही. त्यामुळे अपवाद वगळता ओंगले कुटूंबीय समाजातील समारंभ, लग्न, कार्यक्रम यांना कधीच गेले नाही. त्यामुळे समाजाने त्यांच्यावर बहिष्कार टाकला. आर्थिक दंड ठोठावला. पैसेच नसल्याने ओंगले यांनी दंड भरला नाही. जात पंचायतीच्या आदेशाला धुडकावून लागले. मागील पंधरा वर्षांपासून ते गोंधळी समाजात बहिष्कृत होते. त्यांच्यावरील हा बहिष्कार मृत्यूपर्यंत आणि मृत्यूनंतर ही कायम राहीला. समाजात लोक अंत्यसंस्कार गेली. त्यांनी खांदा दिला, तर त्यांनाही समाजातून बाहेर केले जाईल, अशी धमकी जात पंचायतने दिली. त्यामुळे ओंगले यांच्या मृतदेहाला खांदा देण्यासाठी कुणीच समोर आले नाही.
मात्र, राज्य सेवा आयोगाची तयारी करणा-या त्यांच्या जयश्री नामक मुलीने जात पंचायतीलाच सणसणीत चपराक लावली. आपल्या वडिलांच्या मृतदेहाला खांदा देण्याचा निर्णय घेतला. जयश्रीसह तिच्या सहा बहिणींनी वडिलांच्या पार्थिवाला खांदा दिला. गोंधळी समाजाच्या जात पंचायत सध्या विदर्भात 35 कुटुंब अशा प्रकारे वाळीत टाकली आहे, असे या समाजातील सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितले. समाजातील आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांकडून पैस वसूल करणे, बहिष्कार टाकणे आणि त्याच्या माध्यमातून समाजावर आपली दहशत बसविण्याचे काम जात पंचायत करत आहे, असे या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
(7 sisters did last rights on father as community forcefully isolate them in chandrapur)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.