Cash Seizure : अपघातग्रस्त कारमध्ये सापडली ७० लाखांची रोकड; दोन पोत्यातील रक्कम पोलिसांनी केली जप्त, दोन संशयितांची चौकशी सुरू
Police Investigation : खामगाव-शेगाव रोडवरील अपघातग्रस्त कारमध्ये सापडलेल्या दोन पोत्यांमध्ये तब्बल ७० लाख रुपयांची रोकड आढळून आली. पोलिसांनी ही रक्कम जप्त करून दोन संशयितांची चौकशी सुरू केली आहे.
खामगाव : खामगाव-शेगाव रोडवरील सिद्धिविनायक कॉलेजसमोर ता. ५ एप्रिल रोजी कार व दुचाकीचा अपघात होऊन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती. दरम्यान सदर कारमध्ये ७० लाख ४ हजार ५०० रुपये रोख असलेले दोन पोते पोलिसांना मिळून आले आहेत.