
बुलडाणा : साखळी बुद्रुक (पिराचा मळा) येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेची तिसरीची विद्यार्थिनी सिद्धी विठ्ठल सोनुने (वय ९) हिने प्रजासत्ताकदिनी उत्तराखंडमधील केदारकंठा शिखर सर करत राष्ट्र ध्वजासह भगवा फडकाविला. या साहसाबद्दल सिद्धीचे सर्वत्र कौतूक होत आहे.