अमरावती विभागात 90 लाखांवर मतदार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 मार्च 2019

अमरावती : अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमधील मतदारांची संख्या 90 लाख 38 हजार 747 असून यात 46 लाख 94 हजार 980 पुरुष तर 43 लाख 40 हजार 468 महिला मतदारांचा समावेश आहे.
विभागात अमरावती, अकोला, बुलडाणा आणि यवतमाळ-वाशीम असे चार लोकसभा मतदारसंघ आहेत. विभागातील 90 लाख 38 हजार 747 मतदारांमध्ये सर्वाधिक मतदार अमरावती जिल्ह्यात 24 लाख सहा हजार 619 आहेत, तर अकोला 15 लाख 58 हजार 544, यवतमाळ 21 लाख 28 हजार 163, बुलडाणा 20 लाख 10 हजार 468 आणि वाशीम 9 लाख 34 हजार 549 अशी जिल्हानिहाय मतदार संख्या आहे.

अमरावती विभागात एकूण 10 हजार 143 मतदान केंद्र राहणार आहेत. त्यांची जिल्ह्यानिहाय संख्या पुढीलप्रमाणे आहे. अमरावती दोन हजार 607, अकोला एक हजार 751, यवतमाळ दोन हजार 451, बुलडाणा दोन हजार 251, वाशीम एक हजार 43.
विभागात 48 हजार 371 कर्मचारी मतदान केंद्रावर असतील. अमरावती मतदारसंघात 13 हजार 476, अकोल्यात सात हजार 4, यवतमाळात 12 हजार 460, बुलडाण्यात नऊ हजार 904 व वाशिममध्ये पाच हजार 527 कर्मचाऱ्यांकडे जबाबदारी देण्यात आली आहे.
अमरावती जिल्ह्यातील मोर्शी व धामणगाव (रेल्वे) हे विधानसभा मतदारसंघ शेजारच्या वर्धा लोकसभा मतदारसंघात, यवतमाळ जिल्ह्यातील वणी व आर्णी हे चंद्रपूर तर उमरखेड हे हिंगोली लोकसभा मतदारसंघात समाविष्ट आहे. वाशीम जिल्ह्यातील कारंजा व वाशीम हे यवतमाळ तर रिसोड अकोला लोकसभा मतदारसंघात समाविष्ट आहे. बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर हा विधानसभा मतदारसंघ रावेर लोकसभा मतदारसंघात समाविष्ट आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 90 lakh voters in Amravati division