esakal | कोरोनाचे सावट! ९०० सहकारी संस्थांच्या निवडणुकांना मुदतवाढ, वर्षभरापासून लागलीय प्रतीक्षा
sakal

बोलून बातमी शोधा

900 co operative societies elections extend due to corona in yavatmal

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीनंतर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात निवडणुकीची रणधुमाळीची तयारी सुरू झाली होती. सहकार क्षेत्रातील अनेक संस्थांचा कार्यकाळ पूर्ण झालेला आहे. त्यामुळे या सर्व संस्थांचा निवडणूक कार्यक्रम वर्षभराचा जाहीर करण्यात आला होता.

कोरोनाचे सावट! ९०० सहकारी संस्थांच्या निवडणुकांना मुदतवाढ, वर्षभरापासून लागलीय प्रतीक्षा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे गेल्या 2020 मध्ये जिल्ह्यातील बाजार समित्या, विविध कार्यकारी संस्था, पंतसंस्थांसह अनेक सहकारी संस्था अशा 907 संचालक मंडळांचा कार्यकाळ संपला आहे. या सर्व सहकारी संस्थांमधील निवडणुका एकूण सहा टप्प्यांत घेण्याचे नियोजन जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने केले होते. मात्र, कोरोनामुळे आधी 31 मार्चपर्यंत देण्यात आलेली स्थगिती आता 31 एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली आहे. 

हेही वाचा - चोर पावलांनी कमी होतो शरीरातील ऑक्सिजन; पन्नाशी ओलांडलेल्या ७० टक्के कोरोना रुग्णांना...

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीनंतर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात निवडणुकीची रणधुमाळीची तयारी सुरू झाली होती. सहकार क्षेत्रातील अनेक संस्थांचा कार्यकाळ पूर्ण झालेला आहे. त्यामुळे या सर्व संस्थांचा निवडणूक कार्यक्रम वर्षभराचा जाहीर करण्यात आला होता. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे शासनाने निवडणूक घेण्यासंदर्भात मर्यादा आणल्या होत्या. त्यामुळेच निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झालेला नाही. "अनलॉक"ची प्रक्रिया सुरू झाली होती. वर्षभरात जिल्ह्यातील 907 सहकारी संस्थांची निवडणूक होऊ घातली होती. त्यात बाजार समिती, सेवा सहकारी सोसायट्या, ग्रामविविध कार्यकारी सोसायटी, आदिवासी सोसायट्या, गृहनिर्माण संस्था, पगारदार पतसंस्था, नागरी पतसंस्था, नागरी सहकारी बॅंका, अर्बन बॅंक, खरेदी विक्री संघ, जिनिंग व प्रेसिंग सहकारी संस्था, दुग्ध संस्था, मच्छिमार संस्था आदींच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्थांचे वर्गीकरण करण्यात आले आहे. त्यात "अ' वर्गाच्या दोन, "ब' 338, "क' वर्गातील 106, तर "ड' गटातील 411 संस्थांचा समावेश आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने त्यासाठी सहा टप्प्यात निवडणुकीचा कार्यक्रम तयार केला होता. मात्र, फेब्रुवारी महिण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. परिणामी, निवडणुका 31 मार्चपर्यंत स्थगित ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला नाही. त्यामुळे एप्रिल महिन्यापर्यंत पुन्हा निवडणुकीला स्थगिती देण्यात आली आहे.  

हेही वाचा - कारमध्ये सापडले सहा पेट्या जिलेटिन; दोघांना अटक, दहशतवादविरोधी पथकाची कारवाई

टप्पा एकूण
पहिला 00 02 03 04 09
दुसरा 00 04 04 110 118
तिसरा 00 198 44 213 455
चौथा 00 120 27 14 161
 
पाचवा 02 41 16 29 88
सहावा 00 23 12 41 76
loading image