esakal | कारमध्ये सापडले सहा पेट्या जिलेटिन; दोघांना अटक, दहशतवादविरोधी पथकाची कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

Six boxes of gelatin found in the car two person arrested

सहा पेट्यांमध्ये १ हजार २०० जिलेटिन कांड्या होत्या. शिवाय दोघांचे मोबाईलसुद्धा पोलिसांनी जप्त केले. कानसिंह गणपतसिंह राणावत (रा. संगमेश्‍वरनगर, नांदगावपेठ) व सूरज भारतसिंह बैस (रा. गजानननगर, नांदगावपेठ) अशी कारमधील दोघांची नावे आहेत.

कारमध्ये सापडले सहा पेट्या जिलेटिन; दोघांना अटक, दहशतवादविरोधी पथकाची कारवाई

sakal_logo
By
टीम ई सकाळ

अमरावती : आयुक्तालयाच्या हद्दीतील एका कारमध्ये अवैध स्फोटके (जिलेटिन) आढळून आल्याने खळबळ उडाली. सहा पेट्या जिलेटिनसह एक कार असा १० लाख ५९ हजार ६० रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. पोलिस आयुक्तालयातील दहशतवादविरोधी पथकाने ही कारवाई केली.

नांदगावपेठ हद्दीतील वडगाव माहोरे मार्गावर ही कार उभी होती. दहशतवादविरोधी पथकाने संबंधित कारची तपासणी केली असता ज्वलनशील पदार्थाची अवैध वाहतूक केली जात असल्याचे दिसून आले. वाहनचालक, मालकाकडे यासंदर्भातील परवान्याबाबत पोलिसांनी चौकशी केली असता त्यांच्याकडे कोणताही अधिकृत परवाना नव्हता.

हेही वाचा - निमगडे हत्याकांड : पाच कोटींची सुपारी देणारा कोण? राजकीय क्षेत्रात भूकंप होण्याची शक्यता

सहा पेट्यांमध्ये १ हजार २०० जिलेटिन कांड्या होत्या. शिवाय दोघांचे मोबाईलसुद्धा पोलिसांनी जप्त केले. कानसिंह गणपतसिंह राणावत (रा. संगमेश्‍वरनगर, नांदगावपेठ) व सूरज भारतसिंह बैस (रा. गजानननगर, नांदगावपेठ) अशी कारमधील दोघांची नावे आहेत. ही कार राणावत यांच्या मालकीची असल्याचे दहशतवादविरोधी पथकाच्या पोलिस निरीक्षक नीलिमा आरज यांनी सांगितले.

वाहतुकीचा अधिकृत दस्तऐवज नाही
विहीर फोडण्याच्या कामी या जिलेटिन कांड्या येतात. चौकशीदरम्यान हा माल अमरावतीवरून नांदगावपेठ येथे एका व्यक्तीला देण्यासाठी नेला होता, असे अटकेतील एकाने सांगितले. परंतु, त्यांच्याकडे वाहतुकीचा अधिकृत दस्तऐवज नव्हता. 
- नीलिमा आरज,
पोलिस निरीक्षक, दहशतवादविरोधी पथक अमरावती

महत्त्वाची बातमी - किडनी घेता किडनी, कुणी आहे का? खासगी रुग्णालयांसमोर अनेकांना करतो विचारणा

तीन ट्रकही पकडले

नांदगावपेठ ते वडगाव माहुरे मार्गावर कारमध्ये जिलेटिन पकडल्यानंतर चौकशीदरम्यान हे जिलेटिन समोर असलेल्या ट्रकमधून घेतल्याचे सांगितले. पोलिसांनी पाठलाग करून ज्वलनशील पदार्थाची वाहतूक करणारे ट्रकही पकडले. हे ट्रक अधिकृत वाहतुकीचे असून त्यांच्याकडे परवानासुद्धा असल्याचे पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी सांगितले.

loading image
go to top