अमरावतीत हॉटेलला भीषण आग; मोठ्या प्रमाणात हानी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अमरावतीत हॉटेलला भीषण आग; मोठ्या प्रमाणात हानी

अमरावतीत हॉटेलला भीषण आग; मोठ्या प्रमाणात हानी

अमरावती : अमरावती एमआयडीसीच्या जुन्या महामार्गावर असणाऱ्या गोल्डन रेस्टॉरंट अँड बारला रविवारी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. भीषण आगीत मोठ्या प्रमाणात हाणी झाली. या घटनेने परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे.

गणपती विसर्जनामुळे आज ड्राय डे असल्याने हे रेस्टॉरंट अँड बार बंद होते. दुपारी दीड ते दोन वाजताच्या सुमारास शॉर्टसर्किट होऊन रेस्टॉरंट आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे चार बंब स्थळी पोहोचले. अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली असली तरी या आगीत हॉटेलमधील अनेक वस्तू जळून खाक झाल्या आहेत. सुदैवाने आग हॉटेलच्या गोदामापर्यंत पोहोचली नसल्याने पुढील अनर्थ टळला.

loading image
go to top