
अचलपूर : मेळघाटच्या मोथा गावातील एका गरोदर महिलेची पाचव्या महिन्यात सोनोग्राफी केली असता तिच्या गर्भाशयात एक जिवंत व एक मृत गर्भ असल्याचे आढळून आले. मात्र, डॉक्टरांनी व आरोग्य कर्मचाऱ्यांनी हार न मानता नऊ महिनेपर्यंत सदर महिलेवर लक्ष ठेवले व चिखलदरा येथील ग्रामीण रुग्णालयात तिची सुखरूप प्रसूती केली.