
नंदोरी (जि. वर्धा) : शालेय शिक्षण विभाग शाळेच्या पटसंख्येच्या आधारावर संचमान्यता न ठरविता विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाच्या ग्राह्यतेवरच संचमान्यता ठरविणार आहे. विद्यार्थी आधार कार्ड अपडेट नोंदविण्याची सुविधा स्टुडंट पोर्टलला उपलब्ध आहे. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून राज्यात लॉकडाउन असल्याने शाळांना विद्यार्थ्यांची आधार अपडेट नोंदणी अडचणीचे ठरले. सत्र 2019-20 च्या संचमान्यतेस सुरुवातीस स्थगिती देण्यात आली होती; मात्र नंतर संचमान्यता होणार, असे शिक्षण विभागातर्फे कळविण्यात आले आहे. शिक्षण संचालकांनी 31 जानेवारी 2020 च्या पटसंख्येच्या आधारावर ही संचमान्यता ग्राह्य धरण्यासाठी शासनाकडे परवानगी मागितली आहे. तसेच शाळांनी स्टुडंट पोर्टलवर आधार नोंदणी करण्यास सुचविले आहे; मात्र बऱ्याच विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट नसल्याने अडचणीला सामोरे जावे लागत आहे.
संचमान्यतेच्या आधारावर शाळेतील शिक्षकांची संख्या ठरते. त्यामुळे शिक्षक अतिरिक्त ठरू नये म्हणून आफलाइन संचमान्यता करताना विद्यार्थी संख्या फुगवून दाखविण्याचा प्रकार केला जात होता. हा प्रकार राज्यात एकाच दिवशी विद्यार्थी शोध मोहीम राबविण्यात आली तेव्हा उघडकीस आला. त्यानंतर शाळांच्या संचमान्यता ऑनलाइन करण्यात येऊ लागल्या. यातही बोगसबाजी होऊ नये म्हणून शासन आता विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाच्या ग्राह्यतेवरच शाळांची संचमान्यता ठरविणार आहे.
राज्यात सत्र 2019-20 मध्ये दोन कोटी 17 लाख 25 हजार 994 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यापैकी एक कोटी 24 लाख 55 हजार 169 विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट आहे. मात्र शालेय सत्र संपले तरी स्टुडंट पोर्टलवर 92 लाख 70 हजार 825 विद्यार्थ्यांची आधार अपडेट नोंदणी व्हायची आहे. शालेय शिक्षण विभाग सत्र 2020-21 मध्ये स्टुडंट पोर्टलवर आधारविषयक नोंदी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्याच संचमान्यता करताना विचारात घेणार आहे. शालेय शिक्षण विभाग 30 सप्टेंबरच्या पटसंख्येवर शाळांची संचमान्यता ठरविते.
सविस्तर वाचा -उपराजधानीत हत्याकांडांची मालिका, कायदा व सुव्यवस्थेचा उपस्थित झाला प्रश्न
राज्यातील शिल्लक टक्केवारी
विद्यार्थी आधार नोंदणी आधार नोंद शिल्लक टक्केवारी
21725994 12455169 9270825 57.33
नागपूर विभागातील शिल्लक आधार टक्केवारी
जिल्हा विद्यार्थी आधार नोंदणी आधार नोंद शिल्लक टक्केवारी
भंडारा 205578 191833 13745 93.00
गोंदिया 234189 193889 40300 82.79
वर्धा 211552 131808 79744 61.33
चंद्रपूर 375880 219549 156331 58.41
गडचिरोली 187488 97426 90062 51.96
नागपूर 847006 429954 417052 50.76
एकूण 2061693 1264459 797234 61.33
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.