

Chandrapur News
esakal
पवनी: तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा आमगाव आज जिल्ह्यासाठी एक आदर्श शाळा ठरत आहे. ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानात सलग दोन वर्षे बक्षीस प्राप्त केली असून मागील वर्षी पवनी तालुक्यात द्वितीय क्रमांक आणि यावर्षी भंडारा जिल्ह्यातून द्वितीय क्रमांक मिळविला आहे.