esakal | रस्त्यानं भरधाव वेगात जाताना अचानक दिली वळूला धडक; एकाचा जागीच मृत्यू  
sakal

बोलून बातमी शोधा

accident of two wheeler and wild bull in wardha district

प्रशांत रमेश कोहरे (वय 27) असे मृतकाचे नाव असून तो नेरी (पुनर्वसन) येथील रहिवासी आहे. सौरभ सुधाकर सहारे (वय 21) असे जखमीचे नाव असून तो अल्लीपूर येथील रहिवासी आहे. 

रस्त्यानं भरधाव वेगात जाताना अचानक दिली वळूला धडक; एकाचा जागीच मृत्यू  

sakal_logo
By
दशरथ जाधव

आर्वी (जि.वर्धा) : नेरी (पुनर्वसन) येथील दारूच्या अवैध अड्ड्यावरून मद्य प्राशन करून निघालेल्या दुचाकीचालकाने भरधाव दुचाकी नेत रस्त्यावर असलेल्या वळूला धडक दिली. यात दुचाकी चालक जागीच ठार झाला तर सहप्रवासी व वळूला जबर मार लागला असून दोघांवर उपचार सुरू आहे. ही घटना शुक्रवारी (ता.26) रात्री आठ वाजताचे सुमारास पुलगाव मार्गावरील मॉडेल हायस्कूल लगत घडली.

हेही वाचा - अमरावतीतील भानखेडा परिसरातील ३० हजारांवर कोंबड्या नष्ट करणार; ‘बर्ड फ्लू’ संक्रमित...

प्रशांत रमेश कोहरे (वय 27) असे मृतकाचे नाव असून तो नेरी (पुनर्वसन) येथील रहिवासी आहे. सौरभ सुधाकर सहारे (वय 21) असे जखमीचे नाव असून तो अल्लीपूर येथील रहिवासी आहे. 

हे दोघेही शुक्रवारी (ता.26) रात्री आठ वाजताच्या सुमारास नेरी (पुनर्वसन) येथील दारूच्या अवैध कट्टयावरुन मनसोक्त दारू ढोसून एमएच 32 आर 6681 क्रमांकाच्या दुचाकीने भरधाव वेगाने पुलगाव मार्गाने आर्वीकडे निघाले. मॉडेल हायस्कूल जवळ पोहोचताच त्यांनी रस्त्यावर उभ्या असलेल्या वळूला जोरदार धडक दिली. यात वळू जागेवरच कोसळाला तर वाहन चालक व त्याचा सहप्रवासी दुचाकीवरून फेकल्या गेले.

हेही वाचा - घरगुती कारणावरून बाप-लेकात वाद झाला; रागात वडिलांचे घर जाळून मुलाने घेतले विष

यात दुचाकी चालक प्रशांत कोहरे हा जागीच ठार झाला तर, सहप्रवासी सौरभ सहारे हा जबर जखमी झाला असून त्यांच्यावर सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे तर वळूवर येथील गौरक्षण संस्थेमध्ये उपचार सुरू आहे. या प्रकरणी पोलिसांनी प्राप्त तक्रारीवरून अपघाताची नोंद घेतली असून उपनिरीक्षक चंद्रकांत तावरे हे तपास करीत आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

loading image