esakal | अमरावतीतील भानखेडा परिसरातील ३० हजारांवर कोंबड्या नष्ट करणार; ‘बर्ड फ्लू’ संक्रमित क्षेत्र घोषित

बोलून बातमी शोधा

Over 30000 hens will be destroyed in Bhankheda area of Amravati bird flue news}

सर्वेक्षण क्षेत्रात बाहेरून येणारे किंवा तेथून बाहेर पाठविण्यात येणारे चिकन प्रक्रिया उत्पादने, कुक्कुट पक्षीखाद्य व अंड्यांच्या विक्रीवर तीन महिने बंदी लागू राहील, असे आदेशात नमूद आहे.

अमरावतीतील भानखेडा परिसरातील ३० हजारांवर कोंबड्या नष्ट करणार; ‘बर्ड फ्लू’ संक्रमित क्षेत्र घोषित
sakal_logo
By
सुधीर भारती

अमरावती : भानखेडा परिसरातील काही पोल्ट्री फार्ममधील ३० हजारांवर कोंबड्या रविवारी नष्ट करण्यात येणार आहेत. प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. येथील कोंबड्यांमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाल्याचा अहवाल भोपाळच्या राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेने दिला आहे. त्यामुळे या परिसरातील एक किमीच्या परिसरातील क्षेत्र संक्रमित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.

भानखेडा क्षेत्रातील पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांमध्ये हा प्रादुर्भाव आढळून आला. त्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या आदेशानुसार अमरावती तालुका बर्ड फ्ल्यू संनियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा उपविभागीय अधिकारी उदयसिंह राजपूत यांनी संक्रमित क्षेत्र व सर्वेक्षण क्षेत्राबाबत आदेश जारी केला आहे. त्याचप्रमाणे संक्रमित क्षेत्रातील सर्व देशी कुक्कुट पक्षी, पोल्ट्री फार्ममधील पक्षी, इतर प्रजातीचे पाळीव पक्षी पशुसंवर्धन विभागाच्या स्थापित शीघ्रकृती दलाकडून शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्यात येणार आहेत.

नातेवाईकांच्या घरी पाहुणचार आटोपून परतीला निघाली महिला, रेल्वे स्थानकावर पोहोचली अन् सर्वच संपलं

मृत पक्ष्यांची तसेच पक्षीखाद्य, खाद्यघटक, अंडी, अंड्यांचे पेपर ट्रे, बास्केट, खुराडी, पक्षी खत, विष्ठा आदीही नष्ट करून त्याची विल्हेवाट शास्त्रोक्त पद्धतीने लावावी. संक्रमित क्षेत्रातील पक्षी नष्ट करणे, स्वच्छता, निर्जंतुकीकरण आदी मोहीम पूर्ण झाल्यानंतर सर्वेक्षण क्षेत्रातील उत्पादित कुक्कुट पक्षी व अंडी यांची केवळ त्याच क्षेत्रात अंतर्गत हालचाल व विक्रीस परवानगी राहील.

सर्वेक्षण क्षेत्रात बाहेरून येणारे किंवा तेथून बाहेर पाठविण्यात येणारे चिकन प्रक्रिया उत्पादने, कुक्कुट पक्षीखाद्य व अंड्यांच्या विक्रीवर तीन महिने बंदी लागू राहील, असे आदेशात नमूद आहे. परिसरातील सर्व फार्मवरील पक्षी खोल खड्डा करून नष्ट करण्यात येतील. त्यासाठी कृती दलांकडून कार्यवाही होत आहे, अशी माहिती पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. मोहन गोहत्रे यांनी दिली.

Alert : आज रात्रीपासून ३४ तासांची संचारबंदी

चिकन विशिष्ट तापमानावर शिजवून खा
केवळ भानखेडा परिसरातील एका फार्मवरील कोंबड्यांमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव आढळून आलेला आहे. एका फार्ममधील कोंबड्यांमुळे या परिसरातील अन्य फार्ममधील कोंबड्या नष्ट कराव्या लागणार आहेत. जिल्ह्यात अन्यत्र कुठेही त्याचा प्रादुर्भाव नाही. त्यामुळे चिकन, अंडी विशिष्ट तापमानावर शिजवून व उकळून खाण्यास कुटलाही धोका नाही.
- डॉ. रहाटे,
जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी