वाराणसी येथे अपघातात नागपूरच्या दोघांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 9 November 2019

चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाल्याचे कळते. या अपघातात इनोव्हा गाडी चकनाचूर झाली.

नागपूर : वाराणसी येथे देवदर्शनाला जात असताना मिर्जामुरादाबाद येथे राष्ट्रीय महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला इनोव्हा गाडी धडकल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये नागपूर येथे कार्यरत एक महिला कर्मचारी व गाडीचालक विशाल धमुळे यांचा समावेश आहे. गुरुवारी सकाळी ही घटना घडली. चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाल्याचे कळते. या अपघातात इनोव्हा गाडी चकनाचूर झाली. 

नागपूर येथे रेल्वे मुख्यालयात अधीक्षक असलेल्या सुजाता, पती पेरिस पिटर, मुलगी युहेंस, त्यांचा मित्र व त्याची पत्नी वाराणसी येथे इनोव्हा गाडीने दर्शनाला जात होते. विशाल धमुळे गाडी चालवत होता. गाडी वाराणसीजवळ राष्ट्रीय महामार्गावर असताना मेहंदीगंज येथे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका ट्रकला भीषण धडक दिली. धडकेच्या आवाजाने एकच खळबळ उडाली. जवळपासच्या लोकांना तत्काळ पोलिसांना सूचना दिली व बचाव कार्य सुरू केले. ट्रकमध्ये शिरलेली इनोव्हा बाहेर काढण्याच्या पूर्वीच सुजाता आणि वाहनचालक विशाल मृत झाले होते. इतर गंभीर जखमींना पोलिसांनी ट्रॉमा सेंटर येथे उपचारासाठी दाखल केले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: accident at varanasi