esakal | खुप रंग खेळला, नंतर अंघोळ करायला मित्रासह गेला ११ वर्षीय संस्कार पण...
sakal

बोलून बातमी शोधा

death.

एकमेकांना रंग लावल्यानंतर गावालगत सुरू असलेल्या रस्त्याच्या बांधकामाने पडलेल्या मुरूमाच्या खड्यातील पाण्यात अंघोळ करण्यासाठी ही सहाही मुल उतरली.

खुप रंग खेळला, नंतर अंघोळ करायला मित्रासह गेला ११ वर्षीय संस्कार पण...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गोंडपिपरी  -  रंगपंचमीच्या दिवशी रंगाची उधळण करून खड्ड्यातील पाण्यात मित्रासह अंघोळ करावयास गेलेल्या एका पाचवीतल्या विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना आज सकाळच्या सुमारास गोंडपिपरी तालुक्‍यातील नांदगाव येथे घडली.
नांदगाव येथील संस्कार संजय मोगरे (वय11) हा सकाळी आपल्या पाच मित्रासोबत रंगपंचमी खेळत होता.
एकमेकांना रंग लावल्यानंतर गावालगत सुरू असलेल्या रस्त्याच्या बांधकामाने पडलेल्या मुरूमाच्या खड्यातील पाण्यात अंघोळ करण्यासाठी ही सहाही मुल उतरली.

सविस्तर वाचा - दारूच्या नशेत भाऊ चाकू घेऊन धावला आईच्या मागे, तेवढ्यात लहान भावाने केले हे...
पण संस्कारचा अंघोळ करतांना या खड्ड्यातिल पाण्यात बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती कळताच सारा गाव एकत्र आला. पण संस्कारचा मृत्यू झाल्याने ते काहीच करू शकले नाही. रंगपंचमीच्या दिवशी नांदगावातील एका विद्यार्थ्यांच्या अशा दुदैवी मृत्यूने परिसरातील अनेक गावांनी रंगपंचमी साजरी केली नाही.
संस्कार हा विठ्ठलवाड्यातील शिवाजी विद्यालयात पाचव्या वर्गात शिक्षण घेत होता. त्याच्या अकस्मात मृत्यून कुटुंबियांवर मोठेच संकट कोसळले आहे.  

loading image