esakal | लाॅकडाउन न पाळने भोवले, या प्रकरणात दहा जणांवर गुन्हे दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

crime.jpg

नागरिक कुठल्याही प्रकारची सोशल डिस्टन्स न पाळत असल्याने पोलिसांनी सदर व्यावसायिकांवर जमावबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई केली आहे.

लाॅकडाउन न पाळने भोवले, या प्रकरणात दहा जणांवर गुन्हे दाखल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपळगावराजा (जि.बुलडाणा) : देशावर आलेल्या कोरोना आजाराचे संकट पाहता त्याचा नायनाट करण्यासाठी शासनाने लागू केलेली संचारबंदी व वाढविलेल्या लोकडाऊन मध्ये शासनाच्या नियमांचे सरार्स उल्लंघन केल्याप्रकरणी व विनापरवानगी आठवडी बाजार भरवुन सोशल डिस्टन्स न पल्ल्यामुळे स्थानिक पोलिसांनी भालेगाव बाजार येथील दहा जणांविरुद्ध कारवाई केली आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भालेगाव बाजार येथे दर रविवारी आठवडी बाजार भरतो. मात्र, कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर शासनाने संचारबंदी लागू केलेली असताना भालेगाव बाजार येथे व्यावसायिकांनी दुकाने थाटून ग्राहकांची मोठी गर्दी जमवली. कोरोनामुळे नागरिकांनी घराबाहेर पडू नये म्हणून शासनाच्या पोलिस प्रशासनाने व आरोग्य विभागाने विविध उपाययोजना आखल्या असताना नागरिक कुठल्याही प्रकारची सोशल डिस्टन्स न पाळत असल्याने पोलिसांनी सदर व्यावसायिकांवर जमावबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई केली आहे.

महत्त्वाची बातमी - आश्चर्यम! कधी न भरणाऱ्या गावात लाॅकडाउनमध्ये भरला बाजार, मग झाले असे...

याप्रकरणी पोलिस पाटील रमेश महादेव तिजारे यांनी पिंपळगाव राजा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली की, भालेगाव बाजार येथे दर रविवारी आठवडी बाजार भरत असतो. मात्र संचारबंदीत आठवडी बाजार भरवण्याची परवानगी नसतांना गावात दवंडी देऊन व्यावसायिकानी आठवडी बाजार भरवून शासनाने लागू केलेल्या संचारबंदीचे उल्लंघन केले. त्यामुळे पांडुरंग एकडे, संतोष एकडे, सुमित इंगळे, संदीप सुरळकर, श्रीकृष्ण वेरूळकर,प्रवीण इंगळे, प्रवीण भोरे, अर्जुन इंगळे, गणेश वरखेडे, शेख जफ्फर शेख हनिफ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

loading image
go to top