esakal | आश्चर्यम! कधी न भरणाऱ्या गावात लाॅकडाउनमध्ये भरला बाजार, मग झाले असे...
sakal

बोलून बातमी शोधा

weekly market.jpeg

कलम 144 नुसार पाच व्यक्तीचेवर एकत्रित समूह नसावा यासाठी कार्यवाहीची तरतूद ही करण्यात आली आहे. असे असताना संग्रामपूर तालुक्यात आवार गावात भरलेला बाजार प्रशासनाची कर्तव्यातील पोकळी दर्शविणारा म्हणावा लागेल.

आश्चर्यम! कधी न भरणाऱ्या गावात लाॅकडाउनमध्ये भरला बाजार, मग झाले असे...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

संग्रामपूर (जि.बुलडाणा) : संचारबंदी असतानाही तालुक्यातील आवार गावात 13 एप्रिल रोजी अनधिकृत बाजार भरविण्यात आला. या गावात आता पर्यंत कधीच बाजार भरला नाही. संचारबंदीतच कसा असा प्रश्नही निर्माण होत आहे. तर या बाजाराची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने उपविभागीय अधिकारी यांनी दखल घेतली आहे. 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सरकारकडून लॉकडाउन वाढविण्यात आले. गर्दी होऊ नये यासाठी काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. त्यासाठी आठवडी बाजार, बाजारपेठ (जीवनावश्यक सोडून) बंद केले आहेत. कलम 144 नुसार पाच व्यक्तीचेवर एकत्रित समूह नसावा यासाठी कार्यवाहीची तरतूद ही करण्यात आली आहे. असे असताना संग्रामपूर तालुक्यात आवार गावात भरलेला बाजार प्रशासनाची कर्तव्यातील पोकळी दर्शविणारा म्हणावा लागेल. 

हेही वाचा - खांबोरा पाणीपुरवठा योजनेला लागली गळती

या संदर्भात जळगाव जामोद उपविभागीय अधिकारी यांनी संग्रामपूर गटविकास अधिकारी यांना दूरध्वनीद्वारा कार्यवाही करण्याचा संदेश दिला आहे. गावात समिती स्थापन असताना त्यात शासनाचे कर्मचारी व लोकप्रतिनिधी याचा समावेश असताना ही बाजार कसा भरू दिला हा विषय ही प्रशासनासाठी विचार करायला लावणारा आहे. गटविकास अधिकारी यांनी ग्रामपंचायतला पत्र देऊन 24 तासात स्पष्टीकरण ही मागीतले आहे.

ग्रामपंचायतकडून परवानगी नाही
आमच्या गावात बाजार नसतोच पण आज अचानक कसा भरला याची कल्पनाही लागली नाही. समितीला याची माहिती झालीच नाही. यासाठी ग्रा.पं.कडून कोणतीही परवानगी देण्यात आली नाही.
- गजानन अवचार, सरपंच पती आवार
 
अहवाल सादर करण्याच्या सूचना
आवार गावात अनधिकृत बाजार भरवून गर्दी करून कलम 144 चे उल्लंघन केल्याचे व्हिडीओ वरून दिसून आले. जळगाव जामोद उपविभागीय अधिकारी यांच्या संदेशानुसार आवार सरपंच व सचिव यांना तातडीने पत्र देऊन ज्यांनी अनधिकृत बाजार भरविला त्यांच्या माहितीचा अहवाल सादर करण्याचे सांगितले. त्या नंतर वरिष्ठांच्या सल्ल्यानुसार कार्यवाही करण्यात येईल.
- चव्हाण, गटविकास अधिकारी संग्रामपूर पं.स.

loading image