Yavatmal Crime : सोबत राहण्याच्या कारणातून तृतीयपंथी सोनालीचा खून; नांदेड जिल्ह्यातून आरोपी अटकेत, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
Crime Investigation : तृतीयपंथी सोनाली ठाकरेचा खून केल्याप्रकरणी आरोपीला नांदेड जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. आरोपीने सोबत राहण्यासाठी हट्ट केल्याने त्याने हत्या केली, अशी कबुली दिली.
यवतमाळ : तृतीयपंथी नंदकिशोर ऊर्फ सोनाली ठाकरे हिचा पिंपळशेंडा येथील नाल्याजवळ मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणातील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी (ता. २५) नांदेड जिल्ह्यातील मांडवा येथून ताब्यात घेतले आहे.