रागातून त्याने महिलेच्या मानेवर कुऱ्हाडीने केले वार; आता न्यायालयाने दिला हा निर्णय

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 मे 2020

तालुक्यातील सुरकंडी येथील माऊंट कारमेल स्कूलचे तत्कालिन प्राचार्य संजय वानखेडे यांनी तक्रार दिली की, वनमाला कांबळे ही महिला स्वयंपाकी म्हणून तर अण्णाजी सरदार हा चौकीदार म्हणून काम करीत होता.
 

वाशीम : ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील माऊंट कारमेल मधील वनमाला भीमराव कांबळे (वय 45, रा. काकडदाती) या स्वयंपाकी महिलेचा ता. 13 डिसेंबर 2017 ला मानेवर कुऱ्हाडीने वार करून खून झाला होता. या प्रकरणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने (ता.20) अण्णाजी तुकाराम सरदार यास आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

याबाबत न्यायालयीन सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील सुरकंडी येथील माऊंट कारमेल स्कूलचे तत्कालिन प्राचार्य संजय वानखेडे यांनी तक्रार दिली की, वनमाला कांबळे ही महिला स्वयंपाकी म्हणून तर अण्णाजी सरदार हा चौकीदार म्हणून काम करीत होता. दरम्यान, अण्णाजी व त्याचा मुलगा प्राचार्यांच्या घरातून अन्नधान्य चोरी करीत असल्याची बाब वनमाला हिने फिर्यादीला सांगितली. 

आवश्यक वाचा - COVID19 : मुंबई रिटर्नने वाढवली चिंता; या तालुक्यातही कोरोनाची एन्ट्री, गाव सिल

या रागातून अण्णाजी याने घटनेच्या दिवशी सकाळी वनमाला हिच्यावर कुऱ्हाडीने वार करून तिचा खून केला. अशा माहितीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत, तपासाअंती प्रकरण न्यायप्रविष्ठ केले. या प्रकरणी झालेल्या सुनावनीत न्यायालयाने सात साक्षीदार तपासले. यानंतर दोषी आढळून आलेल्या अण्णाजी सरदार याला आजन्म कारावास व दहा हजार रुपये दंड.

हेही वाचा - सरकारी दवाखान्यांमधील 'रक्त' आटले!, रक्तपेढीत केवळ 39 पिशव्या रक्तसाठा

तसेच दंड न भरल्यास एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या घटनेत तपास अधिकारी म्हणून पीएसआय अशोक जायभाये यांनी काम पाहिले. सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता अभिजीत व्यवहारे यांनी काम पाहिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accused sentenced to life imprisonment, washim District and Sessions Court verdict