चकमकीत ठार झालेला जहाल नक्षली शंकरवर होते एवढे बक्षीस

Accused of several crimes killed in police encounter
Accused of several crimes killed in police encounter
Updated on

गडचिरोली : हेडरी उपविभागातील येलदडमी जंगल परिसरात शुक्रवारी (ता. 3) सायंकाळी 5.30 वाजताच्या सुमारास गडचिरोली पोलिस दलाच्या सी-60 कमांडोंनी एका नक्षल्याचा खात्मा केला. हा जहाल नक्षली पेरमिली दलमचा कमांडर कोटे अभिलाष ऊर्फ चंदर ऊर्फ सोमा ऊर्फ शंकर (वय 36) हा आहे.

शुक्रवारी झालेल्या चकमकीदरम्यान पोलिसांनी नक्षल्यांचा मोठा कट उधळून लावला. घटनास्थळावरून एक हत्यार, दोन प्रेशर कूकर, वायर बंडल, दोन वॉकीटॉकी, कॅमेरा फ्लॅश, 20 पिट्टू व मोठ्या प्रमाणात नक्षली साहित्य जप्त करण्यात आले. यावेळी एका नक्षल्याचा मृतदेह पोलिसांना आढळून आला होता. त्याची ओळख शनिवारी (ता. 4) पटविण्यात आली. नक्षली कोटे अभिलाष ऊर्फ सोमा हा तेलंगणा राज्यातील कारापल्ली, जि. मुलूगू येथील रहिवासी होता.

तो 2008-09 मध्ये नक्षल दलममध्ये सहभागी झाला. 2012-13 पासून तो गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत होता. 2018-19 पासून त्याने पेरमिली दलम कमांडर म्हणून काम सुरू केले होते. त्याच्यावर गडचिरोली पोलिस दलातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये 15 गुन्हे दाखल आहेत. खुनाचे पाच, चकमकीचे पाच, विविध जाळपोळीचे 3, दरोड्याचा एक व इतर एक अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग होता. त्याच्यावर 8 लाखांचे बक्षीस असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सी-60 जवानांनी शुक्रवारी केलेल्या धाडसी कारवाईबद्दल पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी जवानांचे कौतुक केले आहे. तसेच रोख पारितोषिक जाहीर केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com