
लाखांदूर - झुडपात बसलेल्या वाघासोबत सेल्फी काढून दगड फेकून मारल्याच्या संतापजनक प्रकार तालुक्यातील तई बुज या परिसरात बुधवारी घडला. याची दखल वनविभागाने घेतली असून आज गुरुवारी सेल्फी काढणारे व दगड करणाऱ्यांची चौकशी सुरू केल्याची माहिती वनपरिक्षेत्राधिकारी प्रदीप चन्ने यांनी दिली आहे. या प्रकरणात पाच ते सहा व्यक्ती असून त्यांच्यावर कठोर कारवाई होणार असल्याचे निश्चित झाले आहे.