आजपासून अतिरिक्त विशेष प्रवासी रेल्वेगाड्या सुरू...प्रवाशांची होणार थर्मल स्क्रीनिंग

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 जून 2020

भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी आज(ता. 1 जून)पासून गैरश्रमिक नियमित रेल्वेगाड्या सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या अतिरिक्त विशेष प्रवासी रेल्वेगाड्या तिरोडा, गोंदिया, आमगाव येथून पुढील प्रवासाला धावणार आहेत. ज्या प्रवाशांमध्ये कोविड-19 ची लक्षणे आढळणार नाहीत, त्यांनाच रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी देण्यात येईल.

गोंदिया : भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी 1 जूनपासून गैरश्रमिक नियमित रेल्वेगाड्या सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या अतिरिक्त विशेष प्रवासी रेल्वेगाड्या दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूरचे रेल्वे प्रबंधक, नागपूर यांच्याकडून प्राप्त झालेल्या पत्रानुसार तीन रेल्वे गाड्या तिरोडा, गोंदिया आणि आमगाव रेल्वेस्थानकावरून सुटण्याच्या व येण्याचे वेळापत्रक निश्‍चित केले आहे.

 

गाडी क्रमांक 02833 (अहमदाबाद-हावडा) ही गाडी तिरोडा येथे 19.25 वाजता पोहोचून 19.27 वाजता सुटेल. 19.58 वाजता गोंदिया येथे पोहोचून 20 वाजता गोंदिया येथून निघेल. आमगाव येथे 20.15 वाजता पोहोचून 20.17 वाजता निघेल.

 

गाडी क्रमांक 02834 (हावडा-अहमदाबाद) ही गाडी 16.11 वाजता आमगाव येथे पोहोचेल. तेथून ती 16.13 वाजता सुटेल. 16.41 वाजता गोंदिया येथे आगमन व तेथून ती 16.46 वाजता निघेल. तिरोडा येथे 17.06 वाजता पोहोचेल व तेथून 17. 8 वाजता पुढील प्रवासासाठी निघेल.

गाडी क्रमांक 02809 (मुंबई-हावडा विशेष रेल्वे) 13. 08 वाजता गोंदिया येथे पोहोचेल. तेथून 13.13 वाजता सुटेल. गाडी क्रमांक 02810 (हावडा-मुंबई विशेष रेल्वे) गोंदिया येथे 12. 02 वाजता पोहोचून 12.04 वाजता निघेल. गाडी क्रमांक 02070 (गोंदिया-रायगड जन्मशताब्दी एक्‍सप्रेस) दुपारी 15 वाजता गोंदिया येथून सुटेल; तर गाडी क्रमांक 02069 (रायगड-गोंदिया जन्मशताब्दी एक्‍सप्रेस) दुपारी 13.25 वाजता गोंदिया येथे पोहोचेल.

ऑनलाइन पद्धतीने ई-तिकीट

जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांनी या वेळापत्रकाची नोंद घ्यावी. प्रवाशांनी त्यांच्या मूळ गावी पोहोचण्याकरिता वेळापत्रकानुसार पुढील मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करून प्रवास करावा. रेल्वेची तिकिटे फक्त आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर अथवा मोबाईल ऍप्सवर ऑनलाइन पद्धतीने ई-तिकीट स्वरूपात मिळतील. रेल्वेस्टेशनवर कोणतीही तिकिटे उपलब्ध होणार नसल्यामुळे रेल्वेस्टेशनवर अनावश्‍यक गर्दी टाळावी.

जाणून घ्या : वधू चंद्रपूर जिल्ह्यातील असल्याने वराने घेतला हा निर्णय...

प्रवाशांची होणार थर्मल स्क्रीनिंग

ज्या प्रवाशांचे ई-तिकीट निश्‍चित झाले आहे, त्यांनाच रेल्वेस्टेशनच्या आवारात प्रवेश देण्यात येणार आहे. ज्यांची तिकीट निश्‍चित आहे, त्या प्रवाशांनी गाडी सुटण्याच्या पूर्वी दीड ते दोन तास अगोदर रेल्वेस्टेशनवर पोहोचावे. सर्व प्रवाशांची रेल्वे स्टेशनवर थर्मल स्क्रीनिंग करण्यात येणार आहे.

आरोग्य सेतू ऍप्स डाउनलोड करा

ज्या प्रवाशांमध्ये कोविड-19 ची लक्षणे आढळणार नाहीत, त्यांनाच रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी देण्यात येईल. सर्व प्रवाशांनी शक्‍यतो आरोग्य सेतू ऍप्स आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करावा. प्रवाशांनी प्रवास करताना स्वतःचे भोजन व पाणी सोबत घ्यावे, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या अध्यक्ष डॉ. कादंबरी बलकवडे यांनी कळविले आहे.

असं घडलंच कसं? : वेळेवर धावून आला 'परमेश्‍वर' म्हणून वाचला बापलेकीचा जीव...

कमीत कमी साहित्य घेऊन प्रवास करावा

प्रवाशांनी प्रवास करताना आपल्यासोबत कमीत कमी साहित्य घेऊन प्रवास करावा. सर्व प्रवाशांना मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. सर्व प्रवाशांनी स्टेशनवर आणि गाडीमध्ये फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे आवश्‍यक आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Additional special passenger trains start from today