राजपरिवार पहिल्यांदाच सत्तेपासून दूर, नगरपंचायतीवर 'आविसं'ची सत्ता

Aheri Nagarpanchayat Election
Aheri Nagarpanchayat Electione sakal

गडचिरोली : पूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या अहेरी राजनगरी येथील नगरपंचायतीत (Aheri Nagarpanchayat Eelection) कोणाची सत्ता येणार? या एकाच विषयाची मागील पंधरा दिवसांपासून चर्चा होती. त्याला आज पूर्णविराम मिळाला. अहेरी नगरपंचायतीत आदिवासी विद्यार्थी संघटनेचा (आविसं) अध्यक्ष निवडून आला. नगरपंचायत निवडणुकीत आविसं हा सर्वात मोठा दुसरा पक्ष होता. तरीही त्यांनी शिवसेना व राष्ट्रवादीच्या बंडखोरांच्या मतदान आपला अध्यक्ष निवडून आणला. इतक्या वर्षात पहिल्यांदाच राजपरिवाराला सत्तेपासून दूर ठेवले आहे. त्यामुळे राज परिवारासाठी ही धोक्याची घंटा मानली जाते.

Aheri Nagarpanchayat Election
वडगाव नगरपंचायत विशेष सर्वसाधारण सभेत ४२ विषयांना मंजुरी

गडचिरोलीतील अहेरीत आविसंचे 5 नगरसेवक, सेनेचे 2 व राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर 2, असे 9 नगरसेवक एकत्रित येत बहुमताचा मॅजिक आकडा पूर्ण केला. अपक्ष नगरसेवक श्रीनिवास चटारे यांनीही त्यांना पाठींबा दिला. आज झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आविसंच्या रोजा करपेत या निवडून आल्यात, तर उपाध्यक्ष पदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडखोर शैलेश पटवर्धन हे बिनविरोध निवडून आलेत. राजपरिवाराला धक्का देत आविसं अहेरी नगरपंचायतीत सत्ता परिवर्तन करणार असे वृत्त दोन दिवसापूर्वीच दैनिक सकाळ मधून प्रकाशित केले होते. ते आज शंभर टक्के खरे झाले.

अध्यक्ष पदासाठी नामांकन भरताना माजी आमदार दिपक आत्राम व जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांची प्रमुख उपस्थिती बरेच काही सांगून गेली होती व जि.प अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी अहेरी नगरपंचायतीत आपलीच सत्ता शंभर टक्के येणार असल्याची प्रतिक्रिया दिली होती. माजी आमदार दिपक आत्राम यांचे मार्गदर्शनाखाली व जि. प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांचे नेतृत्वाखाली आविसंने प्रथमच नगरपंचायत निवडणूक लढवली होती. तेव्हा त्यांना फारसे कुणीच गांभीर्याने घेतले नाही. परंतु, आविसने पाच नगरसेवक निवडून आणत आपले अस्तित्व निर्माण केले. आजपर्यंत धर्मरावबाबा आत्राम, आंबरीशराव आत्राम या दोन राजपरिवाराव्यतिरिक्त तिसरा कोणीच इथं निवडून आलेला नाही.

अहेरी नगरपंचायतीत आविसची सत्ता आली याचा आनंदच आहे. अहेरी शहरातील प्रमुख समस्या दूर करण्यासाठी व शहराचा विकास करण्यासाठी विरोधकांना विश्वासात घेऊन पारदर्शक कारभार करू. गेल्या अनेक वर्षांपासून राजपरिवाराची सत्ता आपण उलथून टाकत खऱ्या अर्थाने सामान्य जनतेची सत्ता आणली याचा सर्वाधिक आनंद आहे. आता कोणताही व्यक्ती आपली समस्या घेऊन येवू शकतो. भयमुक्त वातावरण निर्माण करण्याचा आपला माणस आहे, असं गडचिरोलीचे जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी सांगितलं.

अहेरीत सत्ता परिवर्तन घडवून आणण्यात खरी भूमिका पार पाडली ती म्हणजे अहेरी जिल्ह्याप्रमुख रियाज शेख यांनी. राष्ट्रवादी काँग्रेस व सेना यांनी युती करुन निवडणूक लढविली. राकाँचे तीन व सेनेचे दोन नगरसेवक निवडून आलेत. पण निवडणूक निकालानंतर रियाज शेख यांनी वेगळी भूमिका घेतली. नवीन सत्ता समीकरण जुळवून आणण्यासाठी त्यांनी आपले लक्ष केंद्रित केले व दोन राकाँ बंडखोर नगरसेवकांना विश्वासात घेत त्यांना थेट मुंबईला नेले व तिथूनच सत्तेचे सर्व सूत्र हलविले. राजपरिवाराला सत्तेपासून दूर ठेवत त्यांनी आविसचे मदतीने सत्ता परिवर्तन घडवून आणले व अहेरीतच नव्हे तर संपूर्ण अहेरी विधानसभा निर्वाचन क्षेत्रात शिवसेनेचे अस्तित्व निर्माण केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com