सोशल मीडियावरील पोस्टवर प्रशासनाचा वॉच; ग्रुप अ‍ॅडमिनवर वाढली जबाबदारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

facebook and whatsapp
सोशल मीडियावरील पोस्टवर प्रशासनाचा वॉच; ग्रुप अ‍ॅडमिनवर वाढली जबाबदारी

सोशल मीडियावरील पोस्टवर प्रशासनाचा वॉच; ग्रुप अ‍ॅडमिनवर वाढली जबाबदारी

यवतमाळ - सोशल मीडियावर (Social Media) प्रत्येकच व्यक्तीचा सक्रीय सहभाग वाढत चालला आहे. मनोरंजन, विचारांची आदानप्रदान होत असतानाच अलीकडे सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट व्हायरल (Post Viral) करण्याचे फॅड वाढले आहे. वादग्रस्त पोस्टमुळे उमरखेड येथे दोन समाजात तणाव (Tension) निर्माण झाल्याची घटना घडली होती. या घटनेची गंभीर दखल घेतली असून, प्रशासनाचा (Administrative) पोस्टवर वॉच राहणार आहे.

व्हाट्स अ‍ॅप, फेसबूक, इंन्स्टाग्रामवर विविध प्रकारच्या पोस्ट नेहमीच बघायला आणि वाचायला मिळतात. यात काही वादग्रस्त पोस्टही असतात. त्यावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जातात. काही समाजकंटक युवक जाणीवपूर्वक दोन समाजात तेढ निर्माण होईल, अशा पोस्ट टाकून मोकळे होतात. त्याचे तीव्र पडसाद उमटतात.

हेही वाचा: १०२ वर्षांच्या आजीनेही केले मतदान

उमरखेड येथे सोशल मीडियावरील पोस्टमुळे दुकानाची जाळपोळ, वाहनांच्या तोडफोडीची घटना घडली. आगामी काळात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक होणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील वातावरण चांगलेच तापणार आहे. काही समाजकंटक वादग्रस्त पोस्ट टाकून सामाजिक सौख्य धोक्यात आणण्याचा प्रयत्नही करू शकतात. त्यामुळे उमरखेड येथील घटनेचा बोध घेत प्रशासनाने गंभीर भूमिका घेतली आहे. धार्मिक, भाषिक, प्रादेशिक गट, जातीत एकोपा टिकण्यास बाधा निर्माण होणारी पोस्ट व्हायरल केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे ग्रुप अ‍ॅडमिनच्या जबाबदारीतही वाढ झाली आहे.

कोणत्याही प्रकारे धर्म, भाषा, जात किंवा जनसमाज यांच्यात कोणत्याही कारणावरुन निरनिराळे धार्मिक, वंशिक, भाषिक, किंवा प्रादेशिक गट अगर जनसमाज यांच्यामध्ये तेढ निर्माण होईल, अशा आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करू नये. अफवा, अनधिकृत माहिती विविध समाज माध्यमामधून पसरविल्यास व्यक्ती, संस्था अथवा संघटना कायदेशीर व दंडनीय कारवाईस पात्र राहतील.

- अमोल येडगे, जिल्हाधिकारी, यवतमाळ

Web Title: Administrative Watch On Social Media Post Responsibility Increase On Group Admin

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Social Mediapost
go to top