
चिखली (जि. बुलढाणा) : तालुक्यातील करवंड या गावाला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. छत्रपती घराण्याच्या दोन कर्तृत्ववान सुनांचे हे माहेर आहे. याठिकाणी त्यांचे स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेच्या प्रवक्ता (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ॲड. जयश्री शेळके यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदनाद्वारे केली आहे.