Navneet Rana: 'अशी लाचारी कोणावरही येऊ नये'; नवनीत राणांना पाडणार, बच्चू कडूंनी केला निर्धार

Navneet Rana got ticket from BJP Amravati: भाजपने ४०० पारचा नारा दिला आहे. ३०० जागा आल्या तरी मोदी पंतप्रधान होतील. एक-दोन जागा कमी झाल्यावर काही फरत पडत नाही.
Navneet Rana  Bacchu Kadu
Navneet Rana Bacchu Kaduesakal

मुंबई- खासदार नवनीत राणा यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. शिवाय भाजपने त्यांना लोकसभेसाठी अमरावतीमधून तिकीट दिलं आहे. पण, या मुद्द्यावरुन प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली आहे. उमेदवारी दिली म्हणजे विजय होतो असं नाही. नवनीत राणा यांना पाडणार. अमरावतीमधून एका चांगल्या उमेदवाराला निवडून आणणार, असं कडू म्हणाले आहेत.

उमेदवारी देऊन विजयी करता येतो का? किंवा सक्षम उमेदवाराला पाठिंबा देण्याचा विचार केला जाऊ शकतो. पण, नवनीत राणा यांना पाडण्यासाठी जे शक्य आहे ते सर्व करु. ज्यांनी भाजपचे झेंडे हाती घेतले. मेहनत केली, अंगावर गुन्हे घेतले. प्रभू रामासाठी जे शहीद झाले त्यांचा भाजपला विसर पडला आहे, असं बच्चू कडू म्हणाले.(After Navneet Rana got ticket from BJP Bacchu Kadu aggressive)

Navneet Rana  Bacchu Kadu
Navneet Rana: नवनीत राणांच्या उमेदवारीमुळे बच्चू कडू यांना धक्का! महायुतीतून पडणार बाहेर? भूमिकेवर लक्ष

रवी राणा यांनी आतमध्ये जाऊन भाजपचं कार्यालय फोडलं होतं. भाजपच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली होती. काय वेळ आली पाहा. भाजप नेत्यावर दुर्दैवी वेळ आली आहे. एवढी लाचारी तर कोणावरही येऊ नये. ज्यांनी अमरावतीमधील भाजपचं कार्यालय फोडलं त्याचा जयजयकार करण्याची वेळ भाजप नेते-कार्यकर्त्यांवर आली आहे, असं म्हणत कडू यांनी टीका केली.

स्वाभिमान गेला, अभिमान गेला. संविधान तर डुबवलच आहे. विकासाचं काम न करता श्रेयवादाचे राजकारण करणाऱ्यांच्या विरोधात आम्ही ताकद उभी करु. सर्व मोठ्या नेत्यांनी एकत्र यावं. ज्याला पाडायचं आहे त्याला टार्गेट करणं आवश्यक आहे, असं ते म्हणाले.

Navneet Rana  Bacchu Kadu
Navnit Rana Resigned: नवनीत राणांकडून पक्षाचा राजीनामा! रवी राणांनी शेअर केली पोस्ट

घरात घुसून मारहाण करण्याची भाषा, कुठेही जातो तर पैसे खातो अशी भाषा रवी राणा यांच्याकडून करण्यात आली. आता पाहू पैसा महत्त्वाचा की प्रामाणिकपणा. राणा यांच्यासारखा पक्ष भाजपच्या दावणीला बांधला नाही. इमानदारीने सरकारमध्ये काम करत राहू, असं बच्चू कडू म्हणाले.

भाजपने ४०० पारचा नारा दिला आहे. ३०० जागा आल्या तरी मोदी पंतप्रधान होतील. एक-दोन जागा कमी झाल्यावर काही फरत पडत नाही. अशा लोकांना घरी बसवा. त्यांची मस्ती घालवा, असंही ते म्हणाले. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com