Navnit Rana Resigned: नवनीत राणांकडून पक्षाचा राजीनामा! रवी राणांनी शेअर केली पोस्ट

आमदार रवी राणा यांनी सोशल मीडियावर पोस्टद्वारे दिली.
Navnit Rana Kaur
Navnit Rana Kaur

मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी आपल्या राष्ट्रीय युवा स्वाभिमानी पार्टीचा राजीनामा दिला आहे. याची माहिती त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी सोशल मीडियावर पोस्टद्वारे दिली. नवनीत राणा या उद्या भाजपत प्रवेश करतील असं सांगितलं जात आहे. आजच भाजपनं त्यांना अमरावती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. (navnit rana resigned from rashtriy yuva swabhimani party post shared by ravi rana)

नवनीत राणा यांनी आपल्या राजीनामा पत्रात काय म्हटलंय?

नवनीत राणा यांनी युवा स्वाभिमानी पार्टीचे संस्थापक अध्यक्ष रवी राणा यांच्याकडं आपला राजीनामा सादर केला आहे. या राजीनामा पत्रात त्यांनी म्हटलं की, "मी नवनीत रवी राणा राष्ट्रीय युवा स्वाभिमानी पार्टीची महिला कार्याध्यक्षपदाचा तसेच प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. पक्षानं आजवर मला जो मानसन्मान दिला, सहकार्य केलं त्याबद्दल मी पक्षाचे आभार मानते. कृपया माझा राजीनामा तात्काळ मंजूर करुन मला सर्व जबाबदाऱ्यांमधून मुक्त करावे" (Latest Marathi News)

Navnit Rana Kaur
Gondia Cash Seized: गोंदियात निवडणूक आयोगाची मोठी कारवाई! 2 कोटींची कॅश अन्...

दरम्यान, युवा स्वाभिमानी पक्षाच्या सदस्यात्वाचा राजीनामा दिल्यानंतर नवनीत राणा या उद्या भाजपत प्रवेश करणार आहेत. कारण भाजपनं त्यांना अमरावती मतदारसंघातून भाजपचा अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केलं आहे. त्यामुळं त्या आता कमळ या भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत. या मतदारसंघात आता भाजपच्या उमेदवार नवनीत राणा आणि काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्यात लढत होणार आहे. (Marathi Tajya Batmya)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com