ग्रीन म्हणता म्हणता रेडकडे वाटचाल! गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा 11 पॉझिटिव्ह

सकाळ वृत्तसेवा
Monday, 25 May 2020

गेल्या 15-20 दिवसांपूर्वी अहेरी, भामरागड व एटापल्ली तालुक्‍यात मुंबईवरून अनेकजण कुटुंब आले होते. त्यांना त्या-त्या ठिकाणी असलेल्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. त्या सर्वांच्या घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. त्याचा अहवाल सोमवारी (ता.25) प्राप्त झाला. या अहवालानुसार आणखी 11 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या आता 24 वर पोचली, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

गडचिरोली : गेल्या 24 तासात गडचिरोली जिल्ह्यात आणखी 11 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 24 वर पोहोचली आहे. आज, सोमवारी प्राप्त अहवालातील 11 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये अहेरी तालुक्‍यातील 2 तर भामरागड व एटापल्ली तालुक्‍यातील 9 रुग्णांचा समावेश आहे.

गेल्या 15-20 दिवसांपूर्वी अहेरी, भामरागड व एटापल्ली तालुक्‍यात मुंबईवरून अनेकजण कुटुंब आले होते. त्यांना त्या-त्या ठिकाणी असलेल्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. त्या सर्वांच्या घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. त्याचा अहवाल सोमवारी (ता.25) प्राप्त झाला. या अहवालानुसार आणखी 11 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या आता 24 वर पोचली, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

अवश्य वाचा- बीपीएल कार्डधारक असलेल्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंनाच मदत, मग इतरांनी उपाशी मरायचे का? क्रीडा खात्याच्या पत्रकावर तीव्र नाराजी

17 मे च्या रात्री प्राप्त झालेल्या अहवालात पहिल्यांदा कुरखेडा तालुक्‍यातील 2 व चामोर्शी तालुक्‍यातील 1 असे 3 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. त्यानंतर ही संख्या सातत्याने वाढत चालली आहे. जिल्ह्यात आजवर आढळून आलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये कुरखेडा तालुक्‍यात 7, चामोर्शी तालुक्‍यात 3, आरमोरी तालुक्‍यात 2, कोरची तालुक्‍यात 1. तसेच आज आलेल्या अहवालात अहेरी तालुक्‍यात 2 तसेच भामरागड व एटापल्ली तालुक्‍यातील 9 रुग्णांचा समावेश आहे. गडचिरोली जिल्ह्यात संशयित रुग्णांचा आकडा हजारावर गेला असून त्यातूनच कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण सापडत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली. लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यापर्यंत गडचिरोली जिल्ह्यात एकही कोरोनाबाधित रुग्ण नव्हता. मात्र, बाहेर राज्यातून प्रवाशांची संख्या वाढल्यानंतर दरदिवशी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडत असल्याचे दिसून येत आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Again 11 corona possive patients found in Gadchiroli District