
कंपनीने जमीन लुटली. मोबदला दिला नाही. पोटाला दोन घास देणारी जमीनच गेल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ आली. अशातच घरातील वृद्ध माणूस आजारी पडला. उपचारासाठी पैसे नव्हते. उपचारासाठी "भीक द्या भाऊ भीक" अशी हाक कुटुंबाने दिली. शासनाला ही हाक ऐकूच आली नाही. जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, शरीर उपचाराला प्रतिसाद देत नसल्याने कुटुंबीय घराकडे निघाले. पोलिस ठाण्यासमोर रुग्णवाहिका उभी झाली. बा... सरकार, आता तरी न्याय द्या, हीच शेवटची इच्छा..! अशी कळकळीची विनंती प्रकल्पग्रस्त वृद्धाने केली.
कोरपना (जिल्हा चंद्रपूर) : मरणाच्या दारात असलेल्या वृद्धाची न्यायासाठी लढाई सुरूच आहे, ती देखील दोन घास अन्नासाठी. गेले 7 वर्ष आपल्याच हक्काच्या भाकरतुकडा देणाऱ्या जमिनीसाठी लढा देणाऱ्या देऊ कुळमेथे यांचे गात्र थकले तरी अजूनही त्यांना न्याय मिळाला नाही.
कंपनीने जमीन लुटली. मोबदला दिला नाही. पोटाला दोन घास देणारी जमीनच गेल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ आली. अशातच घरातील वृद्ध माणूस आजारी पडला. उपचारासाठी पैसे नव्हते. उपचारासाठी "भीक द्या भाऊ भीक" अशी हाक कुटुंबाने दिली. शासनाला ही हाक ऐकूच आली नाही. जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, शरीर उपचाराला प्रतिसाद देत नसल्याने कुटुंबीय घराकडे निघाले. पोलिस ठाण्यासमोर रुग्णवाहिका उभी झाली. बा... सरकार, आता तरी न्याय द्या, हीच शेवटची इच्छा..! अशी कळकळीची विनंती प्रकल्पग्रस्त वृद्धाने केली.
राजुरा तालुक्यातील कुसुंबी गावातील अनेक आदिवासी, कोलाम बांधवांची शेतजमीन माणिकगड कंपनीने हडपल्याचा कंपनीवर आरोप आहे. कुसुंबी गावातील देऊ कुळमेथे यांची आठ एकर शेतजमीन माणिकगड सिमेंट कंपनीने बळकावली असल्याचे कुटुंबीय सांगतात. ही आठ एकन जमीन हेच कुटुंबाचे उदर्निवाहाचे एकमेव साधन होते. जमीन गेल्याने अख्खे कुटुंब उघड्यावर आले. उपासमारीची पाळी आली. मोलमजुरी केल्यावर दोन घास पोटात जात आहेत. अशात घरातील वृद्ध व्यक्ती आजारी पडला. हातात पैसे नाहीत. तहसील कार्यालयासमोर वृद्ध देऊ कुळमेथे यांना खाटेवरुनच तहसील कार्यालयासमोर नेण्यात आले. उपचारासाठी भीक द्या भाऊ भीक, अशी हाक कुटुंबीयांनी दिली. ही हाक भिकेची नव्हती, तर न्यायासाठी होती. मात्र, प्रशासनाला कुळमेथे कुटुंबीयांच्या वेदना कळल्या नाही. शेवटी पोलिसांनी देऊ कुळमेथे यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले. उपचाराला त्यांचे शरीर प्रतिसाद देत नसल्याने कुटुंबीयांनी त्यांना घरी परत आणले.
सविस्तर वाचा - प्रियकराने टाकला दबाव, प्रेयसीला झाले असह्य अन...
ही शेवटची इच्छा..!
माणिकगड सिमेंट कंपनीने आमची जमीन बळकावल्याने माझे अख्खे कुटुंब रस्त्यावर आले आहे. कुटुंबावर भीक मागण्याची पाळी आली आहे. कित्येक वर्षांपासून न्याय हक्कासाठी सतत संघर्ष सुरू आहे. आमची उपासमार, वेदना शासनाला कळल्या नाहीत. मी आयुष्याच्या शेवटचे दिवस मोजतो आहे. मरणापूर्वी नम्र विनंती आहे, माझ्यावर झालेल्या अन्यायाची शिक्षा म्हणून माणिकगड सिमेंट कंपनीविरुद्ध कायदेशीर कारवाई करा. माझ्या कुटुंबाला न्याय द्या. गडचांदूर पोलिसांना दिलेल्या निवेदनात देऊ कुळमेथे यांनी आपल्या वेदना मांडल्या आहेत.
वाचा - प्रणिती शिंदे म्हणाल्या, तुमच्यासाठी अधिवेशन चुकवले ; बरोबर केल, की चूक...
संघर्षाला सीमा नाही
मृत्यूच्या दारात उभ्या असलेल्या देऊ कुळमेथे यांनी 2013 पासून त्यांच्यावर झालेले अन्याय व जमीन हिरावल्यासंबंधी अनेक तक्रारी पोलिस व महसूल प्रशासनाकडे केल्या. न्याय, मागणीसाठी राजुरा येथे 11 दिवस बेमुदत उपोषण केले. पोकळ आश्वासनाशिवाय हाती काहीच आले नाही. त्यांचा आवाज शासन, लोकप्रतिनिधींना ऐकू गेला नाही. संघर्ष करणारे शरीर थकले. कुळमेथे आजारी पडले. त्यांच्या उपचारासाठी कुटुंबाकडे पैसे नाही. कुटुंबियांनी वैतागून आजारी देऊ कुळमेथे यांना खाटेसहीत राजुरा उपविभागीय अधिकारी कार्यालयापुढे ठेवले. भीकमांगो आंदोलन केले. सोबत दोषींवर कारवाईची मागणी केली. त्यावेळी वृद्ध देऊला राजुरा पोलिसांनी खाटेवरून उचलून जिल्हा रुग्णालयात भरती केले. मात्र, उपचाराला उशीर झाल्याने देऊ कुळमेथे यांची प्रकृती अत्यंत खालावली आहे.