प्रियकराने टाकला दबाव, प्रेयसीला झाले असह्य अन्... 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 फेब्रुवारी 2020

2016 मध्ये संजूने तिला पळवून नेले होते. तीन दिवस आपल्यासोबत ठेवून तिला घरी आणून सोडले होते. त्यानंतरही मुलगी संजूसोबत त्याच्या संपर्कात होती. संजूने तिला फोन केल्यावर ती त्याला भेटायला जात असे. त्या वेळी तो तिला मारहाण करीत असे. ही माहिती तिने तिच्या मैत्रिणीला आणि मित्रालासुद्धा दिली होती. घटनेच्या आठ दिवसांपूर्वी संजूने महिमाला फोन करून शिवीगाळ करून 50 हजारांची मागणी केली होती. पैसे नसतील तर तू तुझ्या आईचे दागिने विक आणि मला पैसे दे. तेव्हाच तू माझ्या जीवनात येशील, अन्यथा नाही, अशी धमकीही त्याने दिली होती. सातत्याने तो तिचा छळ करीत असल्याने ती तणावात होती. 

नागपूर : प्रेमसंबंध तोडण्यासाठी प्रियकराने प्रेयसीला 50 हजार रुपयांची खंडणी मागितली. पैसे न दिल्यास बदनामी करण्याची धमकी दिली. प्रियकराने असा रंग दाखविल्यामुळे प्रेयसीने विष प्राशन करून आत्महत्या केली. या प्रकरणी नंदनवन पोलिसांनी लांजी, बालाघाट (म. प्र.) येथील संजू ब्रह्मे या तरुणावर गुन्हा दाखल केला. महिमा (21, रा. नंदनवन) असे मृत तरुणीचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिमा ही नामांकित कॉलेज मध्ये बीबीएच्या अंतिम वर्षाला शिकत होती. ती लहानपणापासून लांजी येथे मामाच्या घरी राहून शिक्षण घेत होती. दरम्यान, तिचे संजू ब्रह्मे नावाच्या तरुणाशी प्रेमसंबंध जुळले. याबद्दल मुलीच्या आईवडिलांना माहीत होताच 2015 मध्ये तिला नागपूरला आणले. त्यानंतर तिने संजूसोबत आपले काहीच संबंध नाहीत, असे आईवडिलांना सांगितले होते. तरीही ती त्याच्या संपर्कात होती. 

- महादेवाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी घेतली रेल्वेतून उडी, काय झाले असावे?

2016 मध्ये संजूने तिला पळवून नेले होते. तीन दिवस आपल्यासोबत ठेवून तिला घरी आणून सोडले होते. त्यानंतरही मुलगी संजूसोबत त्याच्या संपर्कात होती. संजूने तिला फोन केल्यावर ती त्याला भेटायला जात असे. त्या वेळी तो तिला मारहाण करीत असे. ही माहिती तिने तिच्या मैत्रिणीला आणि मित्रालासुद्धा दिली होती. घटनेच्या आठ दिवसांपूर्वी संजूने महिमाला फोन करून शिवीगाळ करून 50 हजारांची मागणी केली होती. पैसे नसतील तर तू तुझ्या आईचे दागिने विक आणि मला पैसे दे. तेव्हाच तू माझ्या जीवनात येशील, अन्यथा नाही, अशी धमकीही त्याने दिली होती. सातत्याने तो तिचा छळ करीत असल्याने ती तणावात होती. 

याच कारणावरून 18 फेब्रुवारी सकाळी 11.30च्या सुमारास महिमाने विष प्राशन केले. उपचारासाठी तिला मेडिकलमध्ये भरती केले असता 20 फेब्रुवारी रात्री 9.20च्या सुमारास तिचा मृत्यू झाला. नंदनवन पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. 

- Video : मुख्याध्यापिकेने दिली ही अमानवीय शिक्षा... विद्यार्थिनींना चालणेही झाले मुश्कील
 
या घटनेनंतर महिमाच्या कुटुंबीयांनी तिच्या मोबाईलची रेकॉर्डिंग ऐकली असता हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी महिमाच्या वडिलांच्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी संजू ब्रह्मे याच्याविरुद्ध 306, 354 (अ), 506 (2) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur boyfriend create pressure on girlfriend