esakal | आरक्षणासाठी जलसमाधीचा प्रयत्न
sakal

बोलून बातमी शोधा

तांडापेठ : जलसमाधीचा प्रयत्न करणाऱ्या युवकांना ताब्यात घेताना पोलिस.

आरक्षणासाठी जलसमाधीचा प्रयत्न

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : संविधानदत्त आरक्षणाचा अधिकार सरकारने हिरावून घेतल्याचा आरोप करीत हलबा समाजातील संतप्त युवकांनी रविवारी तांडापेठ येथील नाईक तलावात जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. सतर्क पोलिसांनी वेळीच 10 युवकांना ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला.
हलबा क्रांती सेनेतर्फे जलसमाधी आंदोलनाची घोषणा करण्यात आली होती. खबरदारीचा उपाय म्हणून पाचपावली पोलिसांनी परिसरात चोख सुरक्षा व्यवस्था तैनात ठेवली होती. सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास हलबा समाजातील युवक घोषणा देत परिसरात दाखल झाले. युवकांच्या मागोमाग समाजबांधव चालत असल्याने आंदोलनाला मोर्चाचे स्वरूप प्राप्त झाले. त्यांना अडविताच परिस्थिती चिघळली. आरक्षण नाकारून सरकार आम्हाला रोज मारत आहे, आता शांततेने मरू देण्याचे आवाहन करीत युवकांनी तलावात उडी घेण्याचा प्रयत्न केला. यामुळे आंदोलक व पोलिसांत चांगलीच झोंबाझोंबी झाली. यानंतर समर्थकांनाही पोलिसांनी पिटाळून लावले.

loading image
go to top