रास्ता रोकोने झाली वाहतुक विस्कळीत, वाचा नेमके कशासाठी?

संदीप रायपूरे
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

वेगळा विदर्भ करण्यात यावा या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसह आज विदर्भ राज्य समीतीच्या वतीेने गोंडपिपरीसह जिल्हयातील अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आले.गोंडपिपरीच्या शिवाजी चैकात विदर्भ राज्य समितीचे शेकडो कार्यकर्ते एकत्र आले.शिवाजी चैकापासून ते तहसिलकार्यालयापर्यत मोर्चा काढण्यात आला.

गोंडपिपरी :  वेगळा विदर्भ राज्य करण्यात यावे या मागणीसाठी विदर्भ राज्य समितीच्या वतीने आज गोंडपिपरीत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामुळे काही वेळ चंद्रपूर अहेरी या प्रमुख मार्गाची वाहतूक विस्कळीत झाली.
वेगळा विदर्भ करण्यात यावा या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसह आज विदर्भ राज्य समीतीच्या वतीेने गोंडपिपरीसह जिल्हयातील अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आले.गोंडपिपरीच्या शिवाजी चैकात विदर्भ राज्य समितीचे शेकडो कार्यकर्ते एकत्र आले.शिवाजी चैकापासून ते तहसिलकार्यालयापर्यत मोर्चा काढण्यात आला.

सविस्तर वाचा - नसबंदी स्वागतार्ह, श्‍वानांच्या उपद्रवाचे काय?

यानंतर तहसिल कार्यालयासमोर चंद्रपूर अहेरी मुख्य मार्गावर रास्ता रोको करण्यात आला.मोर्चाचे नेतृत्व विदर्भ राज्य समितीचे तालुकाध्यक्ष अरूण वासलवार यांनी केले.यावेळी विदर्भ राज्य समिती आंदोलनाचे नेते ऍड.वामनराव चटप यांनीही या आंदोलनात सहभाग घेतला.वेगळया विदर्भाच्या मागणीसह विद्युत बिल माफ करावे,सर्पदंशाने मृत झालेल्यांनाही मदत करण्यात यावी अशा मागणी करण्यात आलीे.आंदोलनात ऍड.वामनराव चटप,अरूण वासलवार,प्रा.डॉ.संजय लोहे,डॉ.एनमरेडडीवार,ऍड.पप्पू आस्वले,छत्तरसिंग डांगी,शेखर बोनगीरवार,श्रीराम काळे,रविद्र हेपट,दत्तू धुडसे,बळवंत भोयर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.येत्या 25 फेररुवारी रोजी वेगळया विदर्भाच्या मागणीसाठी नागपूरात रेल्वे रोको आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती यावेळी ऍड.वामनराव चटप यांनी दिली.आंदोलनादरम्यान गोंडपिपरीचे ठाणेदार संदीप ढोबे यांच्या नेतृत्वात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Agitation for Vidarbha movement